रायपूर, 05 मे : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सध्या सरकारच्या ‘भेट आणि शुभेच्छा’ कार्यक्रमांतर्गत बलरामपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, गुरुवारी राजपूरमध्ये माध्यमांशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या. शालेय मुलांचा अभ्यासाचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मोठं आश्वासन दिलं. तसंच भूपेश बघेल सरकार आता गोधन न्याय योजनेचा विस्तार करणार आहे. सीएम भूपेश म्हणाले की, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत टॉप येणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सरकार हेलिकॉप्टर राइडची सुविधा देईल. मुलांना सरकारद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ही पावले उचलली आहेत. हे वाचा - heart attackचं कारण ठरू शकतात या 4 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या तसंच गोधन न्याय योजनेंतर्गत आतापर्यंत ग्रामीण भागात सरकार 2 रुपये किलो दराने शेण खरेदी करत आहे. जुलै 2020 पासून सुरू झालेल्या या योजनेचा विस्तार करत आता ग्रामीण भागातून गोमूत्रही खरेदी केले जाणार आहे. गोमूत्र शुद्ध करून औषधे बनवली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे महिला आणि ग्रामस्थांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. मात्र, गोमूत्र कोणत्या दराने खरेदी केले जाईल, याबाबत अजून कोणतीही माहिती (Will also buy cow urine) मिळालेली नाही. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गुरुवारी राजपूरमध्ये बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याच्या विकास योजनांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांचे चांगले काम केल्याबद्दल कौतुक करतानाच त्यांनी आपापल्या कामात तत्पर राहण्याच्या सूचनाही दिल्या. हे वाचा - स्वयंपाकघरात मुंग्यांनी वैताग आणलाय? ही एक ट्रिक वापरून बघा कशा पळतात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, गरिबांसाठी छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक निष्काळजीपणा गरीब कुटुंबाला खूप महागात पडतो. या संदर्भात त्यांनी सांगितले की, शिधापत्रिका न दिल्यामुळे एक महिला दोन वर्षांपासून रोखीने रेशन खरेदी करत होती. पडताळणीदरम्यान ही समस्या का विचारात घेतली गेली नाही? राज्य सरकारच्या विकास संकल्पनेचा केंद्रबिंदू सर्वात गरीब व्यक्ती आहे. शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.