मुंबई, 05 मे : आजकाल वेळ अजिबात नसलेल्या काळात घरात विशेषत: स्वयंपाकघरात मुंग्यांनी आक्रमण केलं की नाहक डोकेदुखी वाढते. त्यांच्यापासून खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवताना मोठी कसरत करावी लागते. मुंग्यांना हटवण्यात फुकट वेळ जातो, हा त्रास अनेक घरांमध्ये होतो. यावर आपण काही उपाय जाणून घेऊया, ज्यामुळे मुंग्या घरात होणार नाही. मुंग्यांना पळवून लावण्यासाठी एक सोपा उपाय आहे, ज्यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याचीही गरज भासणार नाही. मुंग्यांना हाकलण्यासाठी आवश्यक असणारी ही वस्तू अनेकांच्या घरातील बाथरूममध्ये (Tricks To Get Rid Of Ants) उपलब्ध असते. टॅल्कम पावडर वापरा - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी बाथरूममधून टॅल्कम पावडर आणा. तुमच्या घरात पावडर नसली तर कोणत्याही दुकानातून तुम्हाला टॅल्कम पावडर अगदी सहज मिळेल. महत्त्वाचे म्हणजे टॅल्कम पावडर ही फार महागडी गोष्ट नाही. कसे वापरावी - मुंग्या जिथून बाहेर पडतातय (Entry Point) अशा भागांवर टॅल्कम पावडर (Talcum Powder) टाका. काही काळानंतर तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. फेसबुकवर मुंग्या नष्ट करण्याच्या प्रश्नाच्या उत्तरात अनेक वापरकर्त्यांनी टॅल्कम पावडर प्रभावी असल्याचे सांगितले आहे. पावडर शिंपडल्यानंतर सर्व मुंग्या नष्ट झाल्याचा दावा केला जात आहे. हे वाचा - Belly Fat वेगात कमी करू शकतात या 5 गोष्टी; कमरेचा घेरापण येईल शेपमध्ये जास्त काळासाठी प्रभावी - ‘द मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनेक युजर्सनी टॅल्कम पावडरचा हा उपाय करून पाहिला आहे. अनेकांना त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. तुमच्या घरातही मुंग्यांनी उच्छाद मांडला असेल तर मुंग्यांच्या प्रवेशबंदीसाठी ही पावडर वापरू शकता. किचनमधून मुंग्या गायब झाल्याचे पाहून तुम्हाला हायसे वाटेल. लहान मुलांच्या संपर्कात अशी पावडर येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हे वाचा - शुगर कंट्रोलपासून वजन कमी करण्यापर्यंत शेवग्याची पानं वरदान! अशा पद्धतीनं वापरा (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.