अहमदनगर, 25 सप्टेंबर : आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या (maharashtra Health department exam finally canceled ) हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे राज्य सरकारवर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. 'परीक्षा अचानक रद्द झाल्या हे अत्यंत चुकीचे असून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या, वेळ पडली तर वरीष्ठ अधिकारी नेमा परंतु युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी खेळू नये' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rajesh tope) यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे राज्य सरकाराला परिक्षा रद्द करावी लागली. या विषयावर पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचे हाल झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रेग्नेन्सी चर्चेदरम्यान Kajal Aggarwal ने दाखवला ग्लॅमरस अवतार; फोटोंनी वेधलं
'हॉल तिकीटांमध्ये गोंधळ झाल्यामुळे आरोग्य विभागाला आपली परीक्षा रद्द करावी लागली आहे. न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षा अचानक रद्द झाल्या हे अत्यंत चुकीचे असून एक कंपनीमुळे जर युवकांना अडचणी येणार असतील तर त्या आमच्यासारख्या युवा आमदारांना चालणार नाही' असं रोहित पवार म्हणाले.
Weird News: वसुलीबाज नवरी! Destination Wedding साठी पाहुण्यांचीच लूट
तसंच, लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या, वेळ पडली तर वरीष्ठ अधिकारी नेमा परंतु युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी विद्यार्थ्यांसोबत असं खेळू नये, असंही रोहित पवार म्हणाले.
अशा परीक्षांना विद्यार्थी येत असतील त्यांचा येण्या जाण्याचा खर्चही शासनाने करावा, अशी मागणीही पवार यांनी केली.
राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी
दरम्यान, 'न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. तसंच, 'परीक्षांची तारीख येत्या 8 ते 10 दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल', असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
'आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफी मागितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.