नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : तुमच्या आजूबाजूला काही जणांना प्रत्येक गोष्टीवरून काहीना, काही बोलत शिव्या देण्याची सवय असते. खूप घाणेरड्या शिव्या देणे त्यांना जणू अभिमानाचे वाटते. असे लोक कुठेही असो घरात बाहेर मित्रांमध्ये सतत शिव्या देत राहतात. खरं तर अशा शिवराळ लोकांना (Abusive People) कोण फारसं जवळ करत नाही, अनेक जण त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार काहींना शिव्या देऊ वाटतील.
नवीन झालेल्या संशोधनानुसार छोट्या छोट्या गोष्टींवरून हे शिव्या देणारे लोक जास्त आयुष्य जगतात. शिव्या दिल्यामुळे त्यांचा तणाव (फ्रस्ट्रेशन) कमी होतो. अशा लोकांची बुद्धीही चांगली राहते. या संशोधनात शिव्या देणे हे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. हे संशोधन न्यूजर्सीच्या (New Jersy) किन विद्यापीठात संशोधकांनी केले आहे. नवे संशोधन शिव्या देणाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता अशा लोकांच्या अंगावर आणखीनच 'मुठभर मास' चढण्याची शक्यता आहे.
हे वाचा -
ब्रिटिशांसमोर अजब पेच! 78 लाख रुपये पगार देऊनही मिळत नाहीत ट्रक ड्रायव्हर, किराणा आणि पेट्रोलचा ठणठणाट
कीन विद्यापीठाने आपल्या संशोधनात काही विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश केला होता. या विद्यार्थ्यांचे हात बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवले गेले. संशोधनामध्ये असे आढळून आले की जे विद्यार्थी या प्रक्रियेदरम्यान शिव्या देत होते ते जास्त काळ थंड पाण्यात हात बुडवून ठेवू शकले. या आधारावर संशोधकांनी अभ्यासाच्या निकालात लिहिले की, शिव्या देऊन रिकामे झाल्याने मेंदूतील निराशा कमी होते आणि मानवी मेंदू निरोगी राहतो.
हे वाचा -
Success Story: अवघ्या 21 वर्षांच्या वयात ‘तिनं’ क्रॅक केली UPSC परीक्षा; लातूरच्या लेकीनं उंचावली महाराष्ट्राची मान
तणाव कमी झाल्यावर व्यक्ती दीर्घायुष्य जगते. संशोधनादरम्यान असे आढळून आले की, जे लोक शिव्या देत नाहीत, ते गंभीर परिस्थितीत त्वरीत हार मानतात. त्यांना जास्त ताण असतो आणि यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे, आता जर तुम्ही शिव्या देणाऱ्यांना भेटलात तर समजून घ्या की ते तुमच्यासोबत दीर्घयुष्य जगणार आहेत.
(सूचना : ही बातमी विविध स्त्रोतांमधून आणि विद्यापीठाच्या संशोधनावरून करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत बातमीतील मतांशी सहमत आहेच असे नव्हे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.