जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Weird News: वसुलीबाज नवरी! Destination Wedding साठी पाहुण्यांचीच लूट, पैसे दिले नाही तर...

Weird News: वसुलीबाज नवरी! Destination Wedding साठी पाहुण्यांचीच लूट, पैसे दिले नाही तर...

Weird News: वसुलीबाज नवरी! Destination Wedding साठी पाहुण्यांचीच लूट, पैसे दिले नाही तर...

ही नवरी पाहुण्यांकडूनच लाखो रुपयांची वसुली करत आहे. कोणत्याही लग्नात असा प्रकार कधीच पाहिला नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

Weird News: लग्नात (Wedding) येणारे पाहुणे नवरा-नवरीसाठी (Guests) विविध प्रकारचे गिफ्ट घेऊन येतात. आणि यासाठी त्यांना बरेच पैसेही खर्च करावे लागतात. मात्र जर लग्नात येण्यासाठी पाहुण्यांकडूनच पैशांची वसुली करण्यात आली तर…? ऐकून आश्चर्य वाटलं ना? मात्र एका नवरीने खरंच असं केलं आहे. तिने आपल्या लग्नात आलेल्या पाहुण्यांकडून 3 हजार पाऊंड म्हणजे तब्बल 3 लाख रुपये मागितले आहेत. इतकच नाही तर जर पैसे दिले नाही तर आपल्या फेसबुक फ्रेंड लिस्‍टमधून (Facebook Friend List) हटविण्याची धमकीही दिली आहे. हे दाम्पत्य थायलँडला जाऊन डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding in Thailand) करू इच्छित होतं. यामुळे नवरीने प्रत्येक पाहुण्याकडून 3 हजार पाऊंडची मागणी केली. नवरीने सांगितलं की, जर आम्ही आमची मित्रमंडळी आणि पाहुण्यांना (150 पाहुणे) थायलँडमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी आमंत्रिक केलं तेव्हा केवळ 9 जणांनी रिप्लाय दिला. त्यावर नवरी म्हणाली की, आमच्या आयुष्यातील या खास क्षणाचा भाग होण्यासाठी तुम्हाला 3 हजार पाऊंड खूप जास्त वाटत आहेत. (Weird News : bride asking money from guests for Destination Wedding in Thailand) हे ही वाचा- नवरीबाई जोमात नवरदेव कोमात! स्वतःच्याच लग्नात घातला धिंगाणा; VIDEO VIRAL नवरी इथवरच थांबली नाही तर दीडशेपैकी केवळ 9 पाहुण्यांनी पैसे देण्याची परवानगी दिल्यानंतर तिला आपल्या लग्नाचं लोकेशन थायलँडवरुन बदलून हवाई केलं. यामुळे आणखी दोन पाहुणे कमी झाले. आता केवळ 7 पाहुणे या दाम्पत्याच्या लग्नात येण्यासाठी तयार आहेत. दिलं 3 दिवसांचं अल्टिमेटम नवरी पुढे म्हणाली की, आता मी लग्नासाठी उत्सुक आहे. येत्या 3 दिवसात जर मित्र मंडळींनी मला रिप्लाय दिला नाही तर त्यांना माझ्या फेसबुक लिस्टमधून हटवेन अशी धमकीही तिने दिली. नवरीच्या अशा वागणुकीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात