जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Monsoon Update: आला रे आला! केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही Rain Alert जारी

Monsoon Update: आला रे आला! केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही Rain Alert जारी

Monsoon Update: आला रे आला! केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही Rain Alert जारी

केरळमध्ये 14 पर्जन्य निरीक्षण केंद्रांपैकी 10 निरीक्षण केंद्रांवर केरळमध्ये मान्सून आल्याचे संकेत दिले आहेत. 10 केंद्रांवर 2.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Kerala in monsoon)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : सर्वांना प्रतिक्षा लागून राहिलेला मान्सून केरळमध्ये (monsoon rain in Kerala) दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून (imd alert monsoon) सांगण्यात आले. दरम्यान मान्सून पूर्व  (pre monsoon rain)पावसाची उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अंदमानात  १६ मेला पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर साऊथ इस्टेट मान्सून वाऱ्यांची दिशा लक्षात घेता सर्वसाधारण अंदाजानुसार ५-१० जून पर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (weather update)

जाहिरात

केरळमध्ये आज 29 मे 2022 रोजी मान्सून सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सून दाखल होण्यापूर्वी पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची समुद्रसपाटीपासून  खोली ४.५ किमी पर्यंत असते. दरम्यान हे वाऱ्यांचा वेग वाढून तो 25-35 kmph गेल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :  Heatstroke Jalgoan : उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू

आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या लगतच्या भागात ढगाळ वातावरणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान केरळमध्ये मागच्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये 14 पर्जन्य निरीक्षण केंद्रांपैकी 10 निरीक्षण केंद्रांवर केरळमध्ये मान्सून आल्याचे संकेत दिले आहेत. 10 केंद्रांवर 2.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. मागच्या काही दिवसांपासूनतापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. काही प्रमाणात उष्णता वाढली आहे. उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जाहिरात

मागच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही कमाल तापमानात घट होत आहे. कोकणात कमाल तापमान ३३ ते ३७ अंश, मध्य महाराष्ट्रात २८ ते ४२ अंश, मराठवाड्यात ३७ ते ४०, तर विदर्भात ३८ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.

हे ही वाचा :  Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा पेट्रोल-डिझेलचा तुमच्या शहरातील भाव

जाहिरात

ओडिशा आणि परिसरावर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वान्यांची स्थिती आहेत. पंजाबपासून उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.१, धुळे ४०, जळगाव ४०, कोल्हापूर ३२.९, महाबळेश्वर २८.२, नाशिक ३४.७, निफाड ३५.५, सांगली ३५.४, सातारा ३४.६, सोलापूर ३ सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.९, रत्नागि ३४, औरंगाबाद ३३.५, परभणी ४०. नांदेड ३९.४, अकोला ४१.९, अमराव ४०.४, बुलडाणा ३८.८, ब्रह्मपुरी ४१, चंद्र ४३, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.६, ४२.४, यवतमाळ ४०.५ तापमानाची नोंद झाली.

जाहिरात

दरम्यान राज्यात मॉन्सूनच्याच्या प्रगतीस पोषक हवामान आहे. पुढील मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटांच्या काही भाग, कोमोरिन समुद्राचा आणखी काही भाग, श्रीलंका देशाचा अंदाज निम्मा भाग, बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात