Home /News /money /

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा पेट्रोल-डिझेलचा तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा पेट्रोल-डिझेलचा तुमच्या शहरातील भाव

कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे.

    मुंबई, 29 मे : देशात सतत वाढत असलेल्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. RBI Rule: बँक FD करण्याआधी बदललेले नवे नियम समजून घ्या, नाहीतर घरबसल्या होईल मोठं नुकसान चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर >> मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर >> दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर >> चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर >> कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग? तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel price

    पुढील बातम्या