मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Heatstroke Jalgoan : उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू

Heatstroke Jalgoan : उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू

किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते.

किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते.

किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते.

जळगाव, 30 मे : राज्यात उन्हाचा पारा (Maharashtra Temperature) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 45 चा आकडा पार केला होता. सर्वात जास्त तापमान हे विदर्भात (Vidarbha) नोंदवण्यात आले. जळगाव जिल्ह्यातही तापामानाने उच्चांक गाठला होता. याठिकाणी 43 डिग्रीच्या वर तापमान नोंदवण्यात आले. या उष्णतेच्या वातावरणात उष्माघाताचा एकाला फटका बसल्याचे समोर आले आहे.

काय आहे घटना -

बहिणीकडे आलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू (Heatstroke) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील रहिवासी होते. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किशोर यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मृत किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते. गुरुवारी दिवसभर त्यांनी काम केले. यानंतर सायंकाळी सहा वाजता रिक्षा थांब्याजवळ चक्कर येऊन ते कोसळले. यानंतर नातेवाईकांनी लगेचच त्यांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

हेही वाचा - नागपूर : घोडा नाचवता नाचवता भयंकर घडलं; मामाच्या वरातीत भाच्याचा दुर्देवी अंत

हवामान खात्याच्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये समुद्राला मोठी भरती येणार असल्याने मुसळधार पाऊस शक्यता आहे. याचा फटका मुंबई आणि उपनगरांना बसण्याची भिती हवामान खात्याने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Heat, Jalgaon, Rise in temperatures, Wave