मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्राणीसंग्रहालयातील स्टाफनं माकडाला दिली सिगारेट, मुक्या प्राण्याची झालेली अवस्था पाहून संतापले लोक

प्राणीसंग्रहालयातील स्टाफनं माकडाला दिली सिगारेट, मुक्या प्राण्याची झालेली अवस्था पाहून संतापले लोक

बँजिन प्राणीसंग्रहालयातील एका बँचवर बसला आहे. त्याच्या तोंडात सिगरेट होती. सिगरेट पेटवलेली होती आणि हे माकड आरामात सिगरेट पित होतं

बँजिन प्राणीसंग्रहालयातील एका बँचवर बसला आहे. त्याच्या तोंडात सिगरेट होती. सिगरेट पेटवलेली होती आणि हे माकड आरामात सिगरेट पित होतं

बँजिन प्राणीसंग्रहालयातील एका बँचवर बसला आहे. त्याच्या तोंडात सिगरेट होती. सिगरेट पेटवलेली होती आणि हे माकड आरामात सिगरेट पित होतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : धूम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक (Smoking is Injurious To Health) असतं. सिगरेटच्या पाकीटावरही याबाबत वॉर्निंग दिलेली असते. मात्र, तरीही लोक धूम्रपान करतात. जगभरात अनेकदा धूम्रपान न करण्याविषयी जागरूकता पसरवली जाते. नुकतंच प्राणीसंग्रहालयाने अॅण्टी स्मोकिंग कॅम्पेनअंतर्गत (Anti Smoking Campaign) एका माकडाचा पिल्लाच्या हातात सिगरेट दिली. हे लहान माकड सिगरेट ओढताना दिसलं. यानंतर एकच गोंधळ उडाला. हा फोटो नॉर्थ चीनमध्ये काढला गेला. माकडाचं हे पिल्लू हेबेई राज्यातील हेंगशुई वाईल्डलाईफ पार्कमध्ये जन्मलं असून त्याचं नाव बँजिन आहे.

समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, VIDEO

माकडाच्या पिल्लाचा हा फोटो चीनी अॅप डोयिनवर व्हायरल झाला आहे. बँजिन प्राणीसंग्रहालयातील एका बँचवर बसला आहे. त्याच्या तोंडात सिगरेट होती. सिगरेट पेटवलेली होती आणि हे माकड आरामात सिगरेट पित होतं. व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेनं हे पाहताच त्याच्या तोंडातून ही सिगरेट काढली. मात्र यानंतर लगेचच हे माकड मागच्या बाजूला कोसळलं. माकडाची अशी अवस्था पाहून लोक हैराण झाले. अनेकांनी माकडाच्या या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. सिगरेटचा माणसांप्रमाणेच प्राण्यांवरही अतिशय वाईट परिणाम होत असल्याचं यातून दिसलं.

सिगरेट पिल्यानंतर बँजिनची अवस्था वाईट झाल्याचं पाहायला मिळालं. महिलेनं त्याच्या अंगावर एक अतिशय पातळ चादर टाकली. हे फोटो समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. वाईल्डलाईफ प्रोटेक्शन टीमनं याबद्दल चिंता व्यक्त रेली. सोबत प्राणीसंग्रहालयाविरोधात कारवाई करण्याचा विचारही केला. मात्र, यानंतर प्राणीसंग्रहालयानं सफाई देत सांगितलं, की लोकांनी धूम्रपान करू नये हे सांगण्यासाठी करण्यात आलेल्या कॅम्पेनचा हा एक भाग होता. याचसाठी हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले गेले. जेणेकरून सिगरेट पिल्यानं काय नुकसान होतं, हे लोकांना समजेल.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूचा खेळ, ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO

प्राणीसंग्रहालयाने हे सांगूनही लोकांचा संताप कमी झाला नाही. प्राण्यांची काळजी घेणं हे प्राणीसंग्रहालयाचं काम असल्याचं लोकांनी म्हटलं. मात्र स्मोकिंग करणाऱ्या माकडाच्या फोटोनं एकच गोंधळ उडाला. लोकांनी हा मोठा हलगर्जीपणा असल्याचं म्हटलं. चीनमध्ये प्राण्यांसोबत असं कृत्य केलं जाणं नवीन नाही.

First published:

Tags: Cigarette, Viral news