मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 'मृत्यूचा खेळ', ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 'मृत्यूचा खेळ', ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी (Cow walks over peoples body as an old tradition) गाय अंगावरून गेल्यावर वर्षभर समृद्धी लाभते, या श्रद्धेपायी नागरिक गायीकडून स्वतःला तुडवून घेतात.

  • Published by:  desk news

उज्जैन, 5 नोव्हेंबर: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी (Cow walks over peoples body as an old tradition) गाय अंगावरून गेल्यावर वर्षभर समृद्धी लाभते, या श्रद्धेपायी नागरिक गायीकडून स्वतःला तुडवून घेतात. आधुनिक काळातही ही अघोरी प्रथा सुरू (Tradition continues in modern times as well) असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतं. मात्र आजही अनेक गावकरी मोठ्या श्रद्धेनं या प्रकारात सहभागी होताना दिसतात. जमिनीवर झोपून अंगावरून गाय धावत जाणं, हा (People take it as holy sign) शुभसंकेत मानला जातो. " isDesktop="true" id="627299" >

काय आहे परंपरा?

मध्यप्रदेशातील उज्जैन गावात ही अनोखी प्रथा वर्षानुवर्षं सुरू आहे. ग्रामस्थांपैकी अनेकजण दिवाळीदिवशी नवस बोलतात. मग हे नवस पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अंगावरून गायी सोडल्या जातात. त्यापूर्वी गावात ज्या ज्या मंडळींनी नवस बोललं आहे, त्यांची मिरवणूक काढण्यात येते. गावातील एका मोकळ्या जागेत त्यांना झोपवण्यात येतं. मग गावातील सर्व गायी एकत्र केल्या जातात आणि या नवस बोलणाऱ्या मंडळींच्या अंगावरून सोडल्या जातात.

जुनी परंपरा

ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली, याची हयात असणाऱ्या कुणालाच नेमकी कल्पना नाही. मात्र गावातील प्रत्येकजण दरवर्षी हा प्रकार पाहत पाहतच लहानाचा मोठा झाला आहे. अंगावरून गाय गेल्यानंतर जीवघेणी दुखापत होण्याची शक्यता असते, अनेकदा वर्मी घाव लागला, तर जीव जाण्याचीदेखील शक्यता असते. मात्र यातील कशाचीही पर्वा न करता गावकरी ही परंपरा साजरी करतात. या परंपरेमुळे गावात शांतता आणि समृद्धी टिकून राहत असल्याची गावकऱ्यांची भावना आहे.

हे वाचा- या' स्मॉल फायनान्स बँका सेव्हिंग्ज अकाउंटवर देतात 7 टक्के व्याज; जाणून घ्या....

यंदाही पार पडला सोहळा

या वर्षी गावातील सात लोकांनी नवस बोललं होतं. या सातजणांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांच्या अंगावर गायी सोडण्यात आल्या. हा सोहळा पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येनं गर्दी करतात. दर वर्षी कुणी ना कुणी नवस बोलतं आणि हा सोहळा पार पडतो आजवर अखंडपणे ही परंपरा सूरू असून पुढेही ती सुरू राहावी, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे.

First published:

Tags: Cow science, Culture and tradition, Madhya pradesh