नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : क्रिकेट मॅचमध्ये उंच आकाशात मारलेले शॉट्स आणि फुटबॉल मॅचमधील जबरदस्त किक तुम्ही बरेच पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर अशा फुटबॉल मॅचचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे की अशी मॅच याआधी तुम्ही काय, कुणीच कधीच पाहिली नसेल. कारण ही जगातील नव्हे तर या जगाबाहेरील फुटबॉल मॅच आहे. या मॅचचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. तब्बल 20 हजार फूट उंचावर गोल करण्यात आलं आहे. फुटबॉलसह खेळाडूही हवेत उडाले आहेत. कोणतीही मॅच म्हटली की समोर येतं स्टेडिअम. तसे स्टेडिअमही खेळाडूंसाठी एक आव्हान असतं. स्टेडिअमच्या रचनेवरही मॅच अवलंबून असते. असे तुम्ही बरेच स्टेडिअम पाहिले असतील. पण ते जमिनीवर. जमिनीवरून हवेत, आकाशात बॉल भिरकावताना तुम्ही पाहिलं असेल. पण कधी कुणाला हवेतच मॅच खेळताना पाहिलं आहे का? हे वाचा - Football: मेसी-रोनाल्डोनंतर ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’, फिफाकडून या भारतीय फुटबॉलरची कहाणी जगासमोर आकाशात जसजसं उंचावर जावं तसतसं तिथलं गुरुत्वाकर्षण कमी होतं. स्पेसमधील असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जिथं अंतराळयानात अंतराळवीर उडताना दिसतात. पण अशा झिरो ग्रॅव्हिटीमध्ये मॅच खेळली गेली तर… जिथं पायही थारावत नाही, तिथं फुटबॉल मॅच अशक्यच असंच तुम्ही म्हणाल. पण काही फुटबॉलर्सनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं. इंटरनॅशनल फुटबॉलर्सच्या टिमने हे चॅलेंज घेतलं आणि ते पूर्णही केलं. एका विमानात फुटबॉल मॅचसाठी सेटअप तयार करण्यात आलं. प्लेनच्या आत फुटबॉल फिल्ड बनवण्यात आलं. त्यानंतर प्लेन इतक्या उंचीवर नेलं जिथं झिरो ग्रॅव्हिटी होती. या जबरदस्त मॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेड आणि यलो टिममधील खेळाडू फुटबॉलला खेळताना दिसतात. सुरुवातीला सर्वकाही सामान्य वाटतं. पण जशी ग्रॅव्हिटी संपली तशी मॅच अधिक रंगात आली. खेळाडू बॉसह हवेत उडू लागले. सायक्लिंग मोडवर ते गोल करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर रेड टिममधील फुटबॉलर लुइस फिगोने गोल केला आणि त्याची टीम जिंकली. हे वाचा - Neeraj Chopra: पाहा ‘गोल्डन बॉय’चा अनोखा अंदाज… फॅन्ससोबत खेळला गरबा, Video Viral जगातील ही अशी पहिली ऑऊट ऑफ द वर्ल्ड फुटबॉल मॅच आहे. या अनोख्या मॅचचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. पॅराबॉलिक फ्लाइटमध्ये सर्वात उंचावर खेळला गेलेला फुटबॉल म्हणून विक्रम झाला. फुटबॉल खेळाडूंची नावं गिनीज बुकमध्ये नोंदवली गेली आहेत. जगातील सर्वात उंचावर पॅराबॉलिक फ्लाइटमध्ये फुटबॉल खेळणारे खेळाडू म्हणून त्यांची नोंद झाली आहे.