मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Neeraj Chopra: पाहा 'गोल्डन बॉय'चा अनोखा अंदाज... फॅन्ससोबत खेळला गरबा, Video Viral

Neeraj Chopra: पाहा 'गोल्डन बॉय'चा अनोखा अंदाज... फॅन्ससोबत खेळला गरबा, Video Viral

नीरज चोप्रा बडोद्यातील नवरात्री उत्सवादरम्यान

नीरज चोप्रा बडोद्यातील नवरात्री उत्सवादरम्यान

Neeraj Chopra: काल नीरज चोप्रानं बडोद्यात पोहोचताच नवरात्रीच्या निमित्तानं देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानं चाहत्यांसह गरबाही खेळला. यावेळी नीरजला पाहण्यासाठी चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बडोदा, 29 सप्टेंबर: सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. याचदरम्यान गुजरातमध्ये आजपासून 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय अॅथलीट गुजरातच्या बडोद्यामध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अहमदाबाद स्टेडियममध्ये या खेळांचा उद्धाटन सोहळा पार पडेल. यावेळी ऑलिम्पिक गोल्ड मेडलविजेता भालाफेकपटून नीरज चोप्राही आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान काल नीरज चोप्रानं बडोद्यात पोहोचताच नवरात्रीच्या निमित्तानं देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानं चाहत्यांसह गरबाही खेळला.

नीरजचा गरबा, व्हिडीओ व्हायरल

नीरजसह बडोद्यातल्या या नवरात्री उत्सवात काॅमेंटेटर चारु शर्माही उपस्थित होते. नीरजनं यावेळी सर्वांसह डान्सचा आनंद लुटला. नीरजचा गरबा खेळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. खरं तर नवरात्रीत गुजरातचा गरबा वर्ल्ड फेमस आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पोहोचताच नीरजही स्वत:ला गरबा खेळण्यापासून रोखू शकला नाही. यावेळी नीरजला पाहण्यासाठी चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक खेळाडूंची दांडी

दरम्यानं भारतीय ऑलिम्पिक समितीच्या वतीनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण तरीही अनेक खेळाडूंनी दुखापतींचं कारण देत या स्पर्धेतून माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णविजेता नीरज चोप्रा, कांस्य विजेता पैलवान बजरंग पुनिया, पैलवान रवी कुमार, रिओ ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

हेही वाचा - Ind vs SA: 19व्या ओव्हरचं करायचं काय? भुवीनंतर अर्शदीपही फेल, रोहितसमोर समस्या कायम

त्याचबरोबर एशियाडमध्ये सुवर्णविजेती विनेश फोगाट, पैलवान दीपक पुनिया, वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा, संकेत सरगर यांनीही दुखापतीचं कारण दिलं आहे. त्याचबरोबर दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत हे बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत खेळणार नाहीत.

मीराबाई चानू मुख्य आकर्षण

पण या खेळांचं मुख्य आकर्षण असेल ती वेटलिफ्टर मीराबाई चानू. मीराबाईनं 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचं खातं खोललं होतं. त्यानंतर बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही मीराबाईनं सुवर्णपदकाची कमाई केली होती. मीराबाई चानूसह बर्मिंगहॅम कॉमनवेल्थचे पदकविजेते अचंता शेऊली, दिव्या काकरान, पूजा गहलोत, बॅडमिंटनपटू एचएस प्रणय, मराठमोळा धावपटू अविनाश साबळे, यासह अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Athletics, Olympic, Sports