मराठी बातम्या /बातम्या /Viral /24 वर्षे वयातच 3 वेळा लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली आपली वेदनादायी कथा

24 वर्षे वयातच 3 वेळा लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली आपली वेदनादायी कथा

Pic Credit : Oneindia

Pic Credit : Oneindia

जेसफॅमनं दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पोटात जुळी मुलं होती, मात्र गरोदर असूनही तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला. नंतर तिनं सांगितलं, की तिचा पती मालकिणीसोबत घरात पकडला गेला होता.

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून कोण कधी प्रसिद्धीझोतात येईल, हे सांगत येत नाही. यात यूट्यूब हा एक उत्तम पर्याय मानला जातो. यातून लाखो यूट्यूबर चांगली कमाई (Youtuber Income) करतात. नुकतंच एका यूट्यूबरनं आपल्या लग्नाबाबत असा खुलासा केला, जो ऐकून सगळेच हैराण झाले. सोबतच जगभरात तिची चर्चा रंगली.

सोशल मीडिया स्टार (Social Media Star) जो जेसफॅंमच्या म्हणण्यानुसार, 24 वर्षाची होईपर्यंत तिनं तीन लग्न केली होती. आता ती २९ वर्षाची आहे आणि तिला ७ मुलं आहेत. ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी आहे. मात्र, अनेक लोकांना विश्वास बसत नाही, की तिला इतकी मुलं आहेत. तिला जो जेसफॅम नावानं ओळखलं जातं मात्र तिचं खरं नाव जेसिका जीन स्क्यूब असं आहे. याशिवाय ती टीकटॉकवरही भरपूर सक्रीय आहे.

जेमनं टीकटॉकच्या एका व्हिडिओमध्ये (Tiktok Video) खुलासा केला, की जेव्हा ती १७ वर्षाची होती, तेव्हा गरोदर होती. तेव्हा ती महाविद्यालयात होती, मात्र बाळाच्या जन्मामंतर तिला आपल्या पार्टनरपासून वेगळं व्हावं लागलं. मात्र, हे दोघं आजही चांगले मित्र आहेत. यानंतर काहीच दिवसात ती आपल्या एका जुन्या मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये आली. काही दिवसातच समजलं की ती पुन्हा एकदा गरोदर आहे. यामुळे या दोघांनीही लग्न केलं. मात्र, लग्नानंतर तीन आठवड्यातच तिला समजलं की तिच्या पतीनं तिला धोका दिला आहे.

भररस्त्यात तरुणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा; VIDEO VIRAL झाल्यानंतर...

जेसफॅमनं दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पोटात जुळी मुलं होती, मात्र गरोदर असूनही तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला. नंतर तिनं सांगितलं, की तिचा पती मालकिणीसोबत घरात पकडला गेला होता. काही काळानंतर तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतर तिच्या पार्टनरनं पुन्हा एकदा सोबत राहण्याची विनंती केली. नंतर २१ वर्षाच्या वयात या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केलं.

काही दिवसातच त्यांना समजलं की त्या दोघांना तिसरं मुल होणार आहे. मात्र बाळाच्या जन्माच्या महिनाभर आधीच तिच्या पतीनं तिची साथ सोडली. यूट्यूबरनं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं, की मी चार मुलांची आई होते आणि दोन वेळा माझा घटस्फोट झाला होता. काही दिवसांनी माझी भेट क्रिस स्क्यूबसोबत झाली. तो दोन मुलांचा पिता होता. या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं. अशात २४ वर्ष वयातच तिची तीन लग्न झाली.

युवकानं एक्स गर्लफ्रेंडला दिलं अनोखं गिफ्ट; पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी

सध्या क्रिस आणि जेस सोबतच राहतात. नुकतंच त्यांनी आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. जेसची चार मुलं होती, तर, क्रिसची दोन. अशात ती सहा मुलांची आई बनली. नुकतंच तिनं क्रिसच्या आणखी एका बाळाला जन्म दिला, हे तिचं सातवं बाळ आहे. जेसच्या म्हणण्यानुसार तिचे इन्स्टाग्रामवर 4 लाख आणि YouTube वर 12 लाख सब्सक्रायबर्स आहेत. यातूनच ती आपला खर्च भागवते.

First published:
top videos

    Tags: Marriage, Tiktok star