Madhya Pradesh News: भोपाळमधील (Bhopal News) ईटखेडी भागात एका तरुणीला बुरखा घालण्यावरुन काही लोकांनी गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रेम युगूल भोपाळमधील इटरखेडी भागात फिरायला गेलं होतं. त्यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. तेव्हा काहीजणं आले आणि त्यांनी प्रेमी युगूलाला नाव विचारलं आणि दुसऱ्या जातीचं असल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीचा बुरखा काढायला लावला. (Video Viral On Social Media)
यानंतरही त्यांनी ऐकलं नाही आणि बुरखा उतरवण्यासाठी चेहऱ्यावर बांधलेला कपडा काढू लागले. ज्यावर युगूलाने आक्षेप घेतला आणि बुरखा देऊन कसं बसं करीत तेथून निघून गेले. हा संपूर्ण घटनाक्रम मोबाइलमध्ये कैद करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ईटखेडी ठाण्यात पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल कर कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात शहरातील संस्कृती बचाव मंचाने तरुणीच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा हटविण्याचा विरोध केला आहे. (Women Forced To Take Off Burka In MP)
हे ही वाचा-तरुणीने नशेत केलं लग्न, 4 दिवसांनंतर नवरीचा खुलासा ऐकताना पतीचा मोठा निर्णय
संस्कृती बचाव मंचाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी याने सांगितलं की, इस्लाम नगरमध्ये एक युगूलला पकडून तरुणीच्या शरीरावर बुरखा काढला आहे. इथपर्यंत तर ठीक होतं, मात्र येथील लोकांनी जबरदस्ती त्या मुलीच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा हटवला आणि तिच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन केलं. तरूणीने वयाची 18 वर्षे पूर्ण केले असून ती स्वतंत्र आहे.
भोपाल के इस्लाम नगर में एक लड़की को धर्म के ठेकेदारों ने बुर्का उतारने के लिए मजबूर किया क्योंकि उन लोगों को शक था कि जिस लड़के की स्कूटी पर वह पीछे बैठी थी, वह हिंदू था. इस घटना का एक वीडियो वायरल हो रहा है!!
ये कैसा सेकलुरिज्म ? pic.twitter.com/S0z7OQcfOQ — Piyush Tiwari (@PiyushTiwariNew) October 17, 2021
तुम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारच्या गुंडावर तातडीने कारवाई करण्यात येते. भोपाळमध्ये एसएसपी इरशाद वलीने सांगितलं की, तक्रार आली नसतानाही आम्ही कारवाई केली आहे. कोणत्याही तरुणीवर अशा प्रकारे जबरदस्ती केली जाऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.