मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग ऑन तर नाही ना? नाहीतर कंपनी ऐकतेय तुमच्या गप्पा

तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग ऑन तर नाही ना? नाहीतर कंपनी ऐकतेय तुमच्या गप्पा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

फोन आपल्यासाठी फायद्याचा असला तरी देखील, तो वापरण्याचे याचे तोटे देखील अनेक आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 28 डिसेंबर : लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोन वापरतात. तुम्हाला असे फार कमी लोक भेटतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. खरंतर स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. अगदी पैसे पाठावण्यापासूने ते फोटो काढणे, रस्ता शोधने आणि माहिती मिळवण्यापर्यंत सगळं काम स्मार्टफोन करतो. ज्यामुळे स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच या गोष्टीला देखील दोन बाजू आहे. फोन आपल्यासाठी चांगलं आहे. पण असं असलं तरी देखील याचे तोटे देखील अनेक आहेत.

तुम्हाला माहितीय का की तुमचा फोन हे तुमचं बोलणं नकळत रेकॉर्ड करत आहे. हो तुमच्या फोनचा मायक्रोफोन हे रेकॉर्ड करण्याचं काम करत असतो.

हे ही पाहा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्ही बऱ्याचदा एकाद्या गोष्टीला घेण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही त्याबद्दल कोणाशी बोललात तरी देखील त्यासंदर्भातील जाहीर तुमच्या समोर येते. मग याचा अर्थ असाच होऊ शकतो की फोन तुमचं बोलणं चोरुन ऐकत आहे.

Apple आणि Google या दोन्ही कंपन्या त्यांचे व्हर्च्युअल असिस्टंट सिरी आणि Google सहाय्यक सुधारण्यासाठी वापरकर्त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात आणि या रेकॉर्डिंगचा उपयोग चांगल्या सेवा देण्यासाठी करतात. असं कंपनीने मान्य केलं आहे.

तसेच रेकॉर्डिंग कोणाच्या आहेत याची ओळख उघड करत नसल्याचा दावा कंपन्या करतात, परंतु असे असलं तरी देखील आपलं बोलणं हे कोणा तिसऱ्या व्यक्तीला ऐकू जातंच आणि ते का जावं असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का?

गंमत म्हणजे या गोष्टी परमिशन किंवा संमती कंपनी तुमच्याकडून घेते आणि तुम्ही स्वत: ते देता देखील.

मग आता प्रश्न असा उभा राहातो की कंपन्या वापरकर्त्यांचे का ऐकतात?

तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा Android फोन वापरकर्ते 'Hey Google' किंवा 'Ok Google' म्हणतात तेव्हा असिस्टंट सक्रिय होतो. त्याचप्रमाणे ऍपल उपकरणांनं देखील 'हे सिरी' व्हॉईस कमांड दिल्यानंतर लगेचच सक्रिय होते.

हे सगळं मायक्रोफोन्सच्या सह्याने होत असतं. कंपन्या वापरकर्त्यांचा व्हॉइस डेटा देखील गोळा करण्याचं काम करतात. ज्यासाठी त्यांच्याकडून अगोदर परवानग्या घेतल्या जातात.

आता हे तुम्हाला बंद करायचं असेल तर काय करायचं?

तुमच्याकडे Apple iPhone किंवा iPad असल्यास, सेटिंग्ज ऍपवर जा आणि 'Siri & Search' वर टॅप करा. येथे तुम्हाला 'Listen for Hey Siri' आणि 'Press Home for Siri' या पर्यायांसमोर दिसणारे टॉगल बंद करावे लागतील.

यानंतर सिरी असिस्टंट ट्रिगर होणार नाही आणि तुमचे शब्द रेकॉर्ड केले जाणार नाहीत. आपण इच्छित असल्यास, आपण सिरी पूर्णपणे अक्षम करू शकता. यासाठी सेटिंग अॅपमध्ये 'Siri' समोर दिसणारे टॉगल बंद करावे लागेल.

First published:

Tags: Phone, Smart phone, Tech news, Viral