जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर आहे. याच कारणामुळे गुगलने काही काळापूर्वी थर्ड पार्टी ऍप्सही बंद केले होते, म्हणजेच थर्ड पार्टी ऍप्सवरून कॉल रेकॉर्डिंग करता येत नाही

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 11 डिसेंबर : आपण बऱ्याचदा फोन रेकॉर्ड करुन समोरच्याचं बोलणं रेकॉर्ड करतो. अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर आहे. याच कारणामुळे गुगलने काही काळापूर्वी थर्ड पार्टी ऍप्सही बंद केले होते, म्हणजेच थर्ड पार्टी ऍप्सवरून कॉल रेकॉर्डिंग करता येत नाही. यासाठी, खरंतर फोनमध्येच इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सुविधा होती, परंतु, जर तुम्ही इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर चालू केले तर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळते. अनेक वेळा असंही होतं की समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असते आणि तुम्हाला याची माहिती देखील नसते. पण आता असं कोणी करत असेल तर तो ओळखला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. हे ही वाचा : Keyboard वरील शब्द हे एका क्रमाने का नसतात? यामागचं कारण फारच कमी लोकांना माहीत चला कॉल रेकॉर्डिंग कसं टाळता येईल पाहू तुमचा फोन कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. आजकाल, नवीन फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची घोषणा सहज ऐकू येते, परंतु जर कॉल रेकॉर्डिंग जुन्या किंवा फीचर फोनवरून होत असेल तर समस्या उद्भवते कारण त्यामध्ये ही घोषणा ऐकू येत नाही आणि अशा परिस्थितीत तुम्हाला इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल. कॉलवर बोलत असताना बीपच्या आवाजाकडे लक्ष द्या. संभाषणादरम्यान बीप-बीपचा आवाज येत असेल तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. तसेच कॉल रिसिव्ह केल्यानंतर बराच वेळ बीपचा आवाज येत असेल तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंग म्हणजे काय? कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंगमधील फरक बहुतेक लोकांना माहित नाही. जेव्हा तिसरी व्यक्ती तुमचे संभाषण रेकॉर्ड करत असते तेव्हा त्याला कॉल टॅपिंग म्हणतात. हे काम टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातूनही होऊ शकते. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर तपास यंत्रणा कॉल टॅपिंग करू शकतात. हे ही वाचा : तिखट खात असाल तर सावधान! यामुळे एका महिलेची झाली धक्कादायक अवस्था पण कॉल रेकॉर्डिंगमध्ये समोरील व्यक्ती किंवा ती दुसरी व्यक्ती तुमचे कॉल रेकॉर्डिंग करत आहे. जे कायद्याने चुकीचे आहे. कॉल टॅपिंगमध्ये कॉल करणाऱ्यांना कळत नाही, पण काही गोष्टींकडे लक्ष द्या, त्यानंतर कॉल टॅप होत आहे की नाही हे समजू शकते. तसेच वारंवार कॉल ड्रॉप होत असेल तर ते कॉल टॅपिंगचे लक्षण मानले जाऊ शकते, परंतु केवळ कॉल ड्रॉपमुळे कॉल टॅप होत आहे असे म्हणता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात