मराठी बातम्या /बातम्या /Viral /'काकूबाई' बनून 28 वर्षाच्या तरुणीने केली बक्कळ कमाई; एका निर्णयाने बदललं आयुष्य

'काकूबाई' बनून 28 वर्षाच्या तरुणीने केली बक्कळ कमाई; एका निर्णयाने बदललं आयुष्य

लियांग शियाओक्विंग नावाच्या या मुलीचं वय अवघं 29 वर्ष आहे. मात्र मागील 10 वर्षांपासून ती 40-50 साल वर्षाची काकूबाई बनून पैसे कमवत आहे (Young Woman Works as an Auntie).

लियांग शियाओक्विंग नावाच्या या मुलीचं वय अवघं 29 वर्ष आहे. मात्र मागील 10 वर्षांपासून ती 40-50 साल वर्षाची काकूबाई बनून पैसे कमवत आहे (Young Woman Works as an Auntie).

लियांग शियाओक्विंग नावाच्या या मुलीचं वय अवघं 29 वर्ष आहे. मात्र मागील 10 वर्षांपासून ती 40-50 साल वर्षाची काकूबाई बनून पैसे कमवत आहे (Young Woman Works as an Auntie).

नवी दिल्ली 31 जानेवारी : सहसा महिलांना आपल्या वयाबद्दल बोलायला आवडत नाही. आपलं वय जास्त दिसू नये, असा प्रयत्न अनेक महिला करत असतात. मात्र, चीनमधील एका तरुणीच्या बाबतीत उलटं घडलं. तिने आपलं वय अधिक असल्याचं दाखवत भरपूर पैसे कमावले.

आपल्या आईची हत्या करणाऱ्यासोबतच महिलेनं केली मैत्री; कारण वाचून व्हाल थक्क

लियांग शियाओक्विंग नावाच्या या मुलीचं वय अवघं 29 वर्ष आहे. मात्र मागील 10 वर्षांपासून ती 40-50 साल वर्षाची काकूबाई बनून पैसे कमवत आहे (Young Woman Works as an Auntie). मॉडेल असलेल्या लियांगचे फोटो पाहून लोकांनाही ती काकूबाई असल्यावर विश्वास बसतो. मात्र अजून ती 30 वर्षाचीही नाही.

1992 साली जन्मलेल्या बीजिंगच्या लियांग हिने 18 वर्षाच्या वयात सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. लियांग फ्लाईट अटेन्डेंट (Flight Attendant) किंवा सुपरमॉडेल (Super Model) होण्याची स्वप्न पाहात होती. मात्र तिला एक मध्यम वयाची महिला म्हणून फोटोशूट करण्याचं इनव्हिटेशन मिळालं. लियांगने हे फोटोशूट केलं मात्र तिला हे आवडलं नाही. मात्र, यातून तिला चांगले पैसे मिळाले. इतकंच नाही तर तिला पुढेही या फोटोशूटसाठी बोलावलं गेलं. लियांगला अंदाजही नव्हता की तिचा हा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल.

अरेच्चा! चक्क स्कूटीच्या सायलेन्सरमध्ये बनवले पॉपकॉर्न; VIDEO पाहून व्हाल अवाक

आपल्या करिअरचे 11 वर्ष पूर्ण केल्यानंतर लियांग चीनची प्रसिद्ध आंटी मॉडेल बनली आहे. जेव्हा कंपन्यांना एखाद्या चांगल्या मध्यम वयाच्या महिलेच्या चेहऱ्याची गरज असते, तेव्हा त्या लियांगशी संपर्क साधतात. तिचा चेहरा आणि हेअरस्टाईलही यासाठी अगदी परफेक्ट आहे. लियांग एक दिवसात साधारण 400 कपड्यांसाठी मॉडेलिंग करते. म्हणजेच प्रत्येका तासाला ती 40 कपडे मॉडल करते. दिवसात ती फक्त 3 ते 4 तासच झोपते. मॉडेलिंगचं काम नसताना ती टिपिकल मुलींसारखे कपडे घालते. मात्र ऑनलाईन महिलांसाठी ती एक काकबाईच आहे.

First published:

Tags: Model, Viral news