नवी दिल्ली 31 जानेवारी : एखाद्याने आपल्या अगदी जवळच्या माणसाला नुकसान पोहोचवणाऱ्या माणसासोबतच मैत्री केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? अमेरिकेतील एका महिलेनं असंच केलं.. सगळ्यात मोठी गोष्टी म्हणजे तिने मैत्री केलेल्या व्यक्तीने तिच्या आईलाच नुकसान पोहोचवलं होतं. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे या व्यक्तीने महिलेच्या आईची हत्या (Mother’s Murderer) केली होती. तेदेखील तेव्हा, जेव्हा ही महिला अवघ्या 15 महिन्यांची होती. मात्र, तरीही महिलेनं त्याला माफ केलं. वाचताना ही घटना एखाद्या सिनेमातील कथेसारखी वाटत असली, तरीही ही खरी आहे. नुकतंच द सन वेबसाईटने अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय मारिया ल्यूकस हिची मुलाखत घेतली. तिच्या आयुष्यातील एक घटना जाणून सगळेच थक्क झाले. मारिया जेव्हा 15 वर्षाची होती, तेव्हा एका व्यक्तीने तिच्या आईची हत्या केली होती आणि यामुळे इतक्यात लहान वयातच तिला आपल्या आईच्या प्रेमाला मुकावं लागलं. मात्र, मारियाने मोठं मन दाखवत त्या व्यक्तीला माफ केलं (Daughter Forgive Mother’s Murderer) आणि त्याच्यासोबत मैत्री केली. पुण्यात राहणाऱ्या टोळीने कर्जतमध्ये धावत्या रेल्वेत टाकला दरोडा, पण… मारियाने मुलाखतीत सांगितलं की तिला 7-8 वर्षाची होईपर्यंत हे माहितीच नव्हतं की तिची आई कुठे आहे. एक हिंसेच्या घटनेनंतर तिचे वडील तुरुंगात गेल्यानंतर ती आपल्या चुलत्याच्या घरी राहू लागली, तेव्हा तिला समजलं की तिच्या आईची हत्या झाली होती. मारिया जेव्हा मोठी झाली तेव्हा रिलेशनशिपमध्ये असतानाच ती गरोदर झाली. मात्र, यानंतर बॉयफ्रेंडला सोडून तिने कोडी नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं आणि आता तिला ३ मुलं आहेत. यादरम्यान मारियाला समजलं की ज्या व्यक्तीने तिच्या आईची हत्या केली होती त्याचं नाव जेसन क्लार्क होतं. मारियाच्या मनात अनेक प्रश्न होते, मात्र तिने कधीही याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र हे सर्व जाणून घेण्याची तिची प्रचंड इच्छा होती 2015 साली तोंडात काहीतरी इन्फेक्शन झाल्याने मारिया रुग्णालयात दाखल झाली, यादरम्यान ती कोमामध्येही गेली. यावेळी तिचा जीवही जावू शकत होता, मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर तिचा जीव वाचवला. आपला जीव वाचल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आयुष्य खूप लहान आहे आणि ते कधीही संपू शकतं त्यामुळे कोणाबद्दलही मनात राग किंवा द्वेष ठेवणं चुकीचं आहे. यानंतर तिने जेसनच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आणि त्याला माफ केलं. माणसं की सैतान! बाप आणि भावाने केले 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार 23 वर्षांनी शिक्षा भोगून जेसन तुरुंगातून बाहेर आला तेव्हा 2016 साली मारियाने त्याची भेट घेतली. तो अतिशय घाबरला होता आणि 50 वर्षाचा झाला होता. त्याने रडतच मारियाची माफी मागितली. मारियाने त्याला विचारलं की माझ्या आईला का मारलं तेव्हा त्याने सांगितलं की तुझ्या आईला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं आणि जेसन ड्रग्ज सप्लाय करत असे. बऱ्याच काळापासून मारियाच्या आईने त्याचे पैसे परत केले नव्हते. एकदा अचानक त्याला मारियाची आई दिसली. तेव्हा जेसन ड्रग्जच्या नशेत होता. त्याने लगेचच महिलेसोबत भांडायला सुरुवात केली आणि नशेत चाकूने तिची हत्या केली. हे ऐकून मारियाला आश्चर्य वाटलं मात्र या गोष्टीमुळे दिलासाही मिळाला की तिला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. तेव्हापासून मारिया आणि जेसन खूप चांगले मित्र झाले आहेत. जेसन अनेकदा मारिया आणि तिच्या कुटुंबायांना भेटायला त्यांच्या घरी येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.