नवी दिल्ली 31 जानेवारी : सोशल मीडियाचं जग अतिशय निराळं आहे. इथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा लोक आपल्या कामामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात, तर अनेकदा लोकांची विचित्र कृत्यं पाहून नेटकरीही भडकतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने पॉपकॉर्न बनवण्यासाठी चक्क सायलेन्सरचा आधार घेतला (Man Make Popcorn in Scooty Silencer). मेडिकल ऑफिसरचा पतीसोबत हॉस्पिटलमध्येच DJ Dance, पेशंटना नाहक त्रास; Video Viral खाद्य पदार्थांसोबत लोकांना अनेक नवनवे प्रयोग (Weird Food Experiment) करताना तुम्ही पाहिलं असेल मात्र पॉपकॉर्न बनवण्यासाठी स्कूटीचा वापर केल्याचं तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता, की एका व्यक्तीने स्कूटी सुरू केली आहे आणि तो स्कूटीच्या सायलेंसरमध्ये हळूहळू मक्याचे दाणे टाकत आहे. हे दाणे सायलेंसर गरम असल्याने शिजून पॉपकॉर्न बनत आहेत. यानंतर हा व्यक्ती रेसच्या माध्यमातून हे शिजलेले पॉपकॉर्न पुन्हा एका ग्लासमध्ये काढत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. जिगरबाज कर्मचाऱ्याने आग विझवली, वसईच्या पेट्रोल पंपावर मोठा अनर्थ टळला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thegreatindianfoodie नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओ 5 लाख 90 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. यासोबतच व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हा काय वेडेपणा आहे, निदान पॉपकॉर्नला तरी सोडा. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, आता फक्त हेच बघणं बाकी होतं. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, हे पॉपकॉर्न खाणाऱ्याला नक्कीच कॅन्सर होईल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.