नवी दिल्ली 22 जून: जगातील अनेक लोकांना जनावरं किंवा प्राणी पाळण्याचा छंद असतो. या पाळीव प्राण्यांना (Pet Animals) त्यांचे मालक बाहेर फिरण्यासाठी घेऊन जातात तेव्हा प्राण्यांच्या गळ्यात पट्टा बांधतात. जेणेकरुन या प्राण्यांनी इकडे-तिकडे पळू नये. ज्या लोकांच्या घरात प्राणी नाहीत, त्यांनीही ही दृश्ये नक्की पाहिली असतील. मात्र, कधी कोणी एखाद्या अतिशय भितीदायक किंवा हिंस्र प्राण्याच्या गळ्यात पट्टा बांधू शकतं, असा विचार तुम्ही कराल का? तुमचं उत्तर नाही असंच असेल. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ (Viral Video) चर्चेचा विषय ठरत आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. खोदा पहाड निकला..; हिरा आढळल्याचं ऐकून हजारो लोकांनी दिवसरात्र केलं खोदकाम,अन्.. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोघांनी एका वाघाच्या गळ्यामध्ये (Viral Video of Tiger) पट्टा बांधला आहे. हा वाघ जमिनीवर बसला आहे. याचदरम्यान एक व्यक्ती अचानक वाघाची शेपटी धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. तर, दुसरा व्यक्ती या वाघाला उठवण्यासाठी त्याच्या गळ्यातील पट्टा खेचताना दिसतो. या दोघांचा हा व्हिडिओ नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की त्या दोघांच्या या कृत्यामुळे वाघही त्यांच्याकडे पाहू लागतो. मात्र, तरीही तो या दोघांवर हल्ला करत नाही. या दोघांनी वाघासोबत केलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका यूजरनं म्हटलं आहे, की हा खरंच वेडेपणा आहे. हा वाघ आहे, गल्लीतील कुत्र नाही. रुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअॅक्शनचा VIDEO wildanimals_2 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ एक दिवस आधीच शेअर केला गेला आहे. आतापर्यंत तो 70 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या इन्स्टाग्राम पेजवरुन अनेकदा असे व्हिडिओ शेअर केले जातात, जे पाहून नेटकरीही हैराण होतात. याच कारणामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होतात.