नवी दिल्ली 22 जून: दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) एका गावात हिरा (Diamond) आढळल्याची बातमी ऐकून मोठ्या संख्येनं लोक डोंगराळ भागात गेले आणि हिऱ्यांच्या शोधात खोदकाम करू लागले. आपल्यालाही हिरा मिळेल, या आशेनं दूर-दूरहून लोक याठिकाणी आले. हिरे मिळवण्यासाठी या लोकांनी दिवसरात्र खोदकाम सुरूच ठेवलं. मात्र, आता या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. पूर्व दक्षिण आफ्रिकेतील (Eastern South Africa) क्वाजुलु-नतालमध्ये (KwaZulu-Natal) एका डोंगरावर आढळलेल्या एका चमकदार धातूला लोक हिरा (Diamond) समजत होते. मात्र, प्रत्यक्षात हा केवळ एक चमकदार दगड असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीच्या तपासात समोर आलं, की हा दगड क्वार्ट्ज क्रिस्टल आहे. VIDEO: ‘माझा होशील ना’, सईच्या मदतीसाठी आला डॅडा; मात्र घडलं भलतच डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, जनावरांनी चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेलेल्या एक व्यक्तीला याठिकाणी एक चमकदार दगड आढळला. हा दगड हिरा असल्याचं त्या व्यक्तीला वाटलं. यानंतर लोक हिरा शोधण्यासाठी डोंगरावर गेले आणि खोदकाम सुरू केलं. हिरा मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक डोंगरावर पोहोचले आणि खोदकाम सुरू केलं. मात्र, आता सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, कि डोंगरावर आढळलेला हा धातू हिरा नसून केवळ एक चमकदार दगड आहे. याची किंमतही हिऱ्याच्या तुलनेत अतिशय कमी आहे. डोंगरावर गर्दी जमल्यानंतर सरकारनं जियो सायनटिस्ट आणि मायनिंग एक्सपर्ट्ला सँपल कलेक्ट करण्यासाठी पाठवले. यानंतर हे दगड हिरे नसल्याचं स्पष्ट झालं. पाहिले नं…मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा ‘तो’ VIDEO होतोय VIRAL हिरे सापडल्याचं वृत्त ऐकताच हजारोच्या संख्येनं लोक या डोंगरावर पोहोचले आणि दिवसरात्र खोदकाम सुरू केलं. प्रशासनानं आता ही जागा रिकामी करण्यास सांगितलं आहे. कारण, गर्दी जमा झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यताही वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.