रुग्णालयातच गाण्यावर थिरकू लागल्या नर्स, रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर नर्सचा एक व्हिडिओ (Nurse Dance Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला रुग्ण आपल्या बेडवर झोपली आहे.

सध्या सोशल मीडियावर नर्सचा एक व्हिडिओ (Nurse Dance Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला रुग्ण आपल्या बेडवर झोपली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली 22 जून: आपण जेव्हा आजारी असतो, तेव्हा सगळं अगदी नकोसं वाटतं आणि आपण लवकर बरं होण्याची वाट पाहात असतो. मात्र, लवकर होण्यासाठी स्वतःला सकारात्मक (Positive) ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. रुग्णालयांमध्ये (Hospital) दाखल असलेल्या रुग्णांना लवकर बरं होऊन घरी जाण्याची इच्छा असते. रुग्णालयातील स्टाफ (Hospital Staff) आपल्या कामासाठी वार्डमध्ये येतात आणि काम झालं की निघून जातात. मात्र, खूपच कमी वेळा असं पाहायला मिळतं, कि स्टाफमधील लोक रुग्णाला आनंदी ठेवण्यासाठी किंवा त्यांचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी करतात. असं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा? नवरदेवाला लगावली कानशिलात अशात सध्या सोशल मीडियावर दोन नर्सचा एक व्हिडिओ (Nurse Dance Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, कि महिला रुग्ण आपल्या बेडवर झोपली आहे. इतक्यात इन्स्टाग्रामवरील एका प्रसिद्ध म्यूझिक व्हिडिओवर (Famous Music Video) तिथे उपस्थित असलेल्या दोन नर्स डान्स करू लागतात. हे पाहून बेडवर झोपलेल्या रुग्णाचा मूडही ठीक होतो. इतकंच नाही तर ही महिला रुग्ण या दोन्ही नर्सला साथ देण्यासाठी त्यांच्या हातावर टाळी देते.
    हास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात कोरोनाकाळात रुग्णांना आधार देण्यासाठी अनेक डॉक्टर आणि नर्स उपचाराशिवाय रुग्णांना आनंदी ठेवण्याचाही प्रयत्न करत आहेत. यादरम्यान अशाच डान्सचे आणि गाणे गातानाचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. सध्या समोर आलेला नर्सचा हा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला दहा हजारहून अधिकांनी लाईक केलं आहे. यासाठी नेटकऱ्यांनी नर्सचं भरपूर कौतुकही केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: