नवी दिल्ली 26 मार्च : सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपला भरपूर वेळ मोबाईल स्क्रीनसमोर घालवत असतो. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे आपल्याला दाखवतात की सतत मोबाईल स्क्रीन पाहात राहण्याचे आणि मोबाईलकडे बघत काम करताना काय परिणाम भोगावे लागू शकतात. धावत्या मेट्रोचं गेट उघडून घेतली उडी; व्यक्तीसोबत घडलं अतिशय भयानक..थरारक घटनेचा VIDEO नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना मोबाईलमध्ये काहीतरी बघत चाललेला दिसतो. त्यामुळे त्याचं लक्ष रस्त्यावर नसतं आणि तो अपघाताचा बळी ठरतो. सायकल चालवताना मोबाईल बघत असल्याने तो समोर उभ्या असलेल्या एका वाहनावर जाऊन आदळला, सुदैवाने त्याला फारशी दुखापत झाली नाही. मात्र याच जागी एखादं भरधाव वेगाने येणारं वाहन समोर असतं, तर त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असता.
Officers from our Roads And Transport Squad appeal for information following an incident where a van has caused an accident with a cyclist
— Sandford Police (@Sandford_Police) March 24, 2023
Anyone with info relating to the van please get in touch via our website pic.twitter.com/RGLbt301OX
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करून वाहन चालवताना मोबाइलचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. सँडफोर्ड पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. त्यादरम्यान तो मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात पूर्ण मग्न झालेला दिसतो. त्यामुळे त्याला रस्त्यावर उभं असलेलं वाहन दिसत नाही आणि तो सरळ त्या वाहनाला जाऊन धडकतो.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो हे वृत्त लिहिपर्यंत 27 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 24 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स थक्क झाले आहेत. यासोबतच रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, असं आवाहनही ते करत आहेत. काही वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, की ती व्हॅन तिथे उभी नसायला पाहिजे होती. त्याच्यामुळेच हा अपघात झाला आहे.