नवी दिल्ली 26 मार्च : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये मेट्रो सेवा वेगवेगळ्या प्रकारे चालते. या मेट्रो सेवांचे नियम देखील वेगळे आहेत, मात्र त्यांची धावण्याची शैली आणि प्रवाशांसाठी सेवा जवळजवळ समान आहेत. अनेकवेळा मेट्रोच्या आतील काही आश्चर्यकारक घटनाही व्हायरल व्हिडिओंमधून समोर येतात. सध्या असाच एक अतिशय भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या मेट्रो ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न करतो.
VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...
नुकताच हा व्हिडिओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून तो भारताबाहेरचा असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या देशाचा आहे याची पुष्टी झालेली नसली तरी तो व्हायरल झाल्यावर लोकांनी तो शेअर करायला सुरुवात केली आणि या व्यक्तीवर संताप व्यक्त केला.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) March 24, 2023
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या गेटजवळ उभी असल्याचं दिसत आहे. या दरम्यान मेट्रो धावत आहे. इतक्यात त्या व्यक्तीला काहीतरी वाटलं आणि त्याने जबरदस्तीने मेट्रोचं गेट उघडण्यास सुरुवात केली. यानंतर गेट उघडलं. पण गेट उघडताच मेट्रो अजूनही धावत असून ती स्टेशनपर्यंत पोहोचलेली नसल्याचं दिसलं. मात्र तरीही हा व्यक्ती न थांबता ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न करतो.
या व्यक्तीने गेट पूर्णपणे उघडून मेट्रोतून उडी मारताच तो प्लॅटफॉर्मवर इतका भयानक पडला की त्याला दुखापत झाली. हा व्हिडिओ इथेच संपतो पण हा एवढा धोकादायक प्रकार आहे की यात एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मेट्रो एका स्टेशनवर पोहोचणार होती, मात्र त्याआधीच त्या व्यक्तीने धावत्या मेट्रोचं गेट उघडून खाली उडी घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.