• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भीतीदायक प्राण्यांसोबत रात्र घालवण्याची संधी; एका रात्रीसाठी लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत लोक

भीतीदायक प्राण्यांसोबत रात्र घालवण्याची संधी; एका रात्रीसाठी लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत लोक

तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल तर हा लॉज तुम्हाला नक्कीच आवडेल. याची बुकिंग पुढील वर्षीपासून सुरू होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : जगात फारच कमी माणसं अशी असतील ज्यांना प्राण्यांसोबत झोपणं (Sleep With Wild Animals) आवडत असेल. अशा परिस्थितीत अगदी काही वेळाची झोपही तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मात्र, जर तुम्हाला असा बेड दिला गेला, ज्यावर तुमच्यासोबत पार्टनर म्हणून अनेक भीतादायक प्राणी आहेत, तर? अशाच एका लॉजचे फोटो यूकेमधून (United Kingdom) समोर आले आहेत. इथे एक असा अॅनिमल लॉज तयार करण्यात आला आहे. ज्यात माणसं अनेक धोकादायक प्राण्यांसोबत राहू शकतील. या प्राण्यांमध्ये गेंड्यापासून हत्ती आणि जिराफाचाही समावेश आहे. दुचाकीवर उभा राहून हायवेवर करत होता स्टंट; इतक्यात तोल गेला अन्..., पाहा VIDEO तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल तर हा लॉज तुम्हाला नक्कीच आवडेल. याची बुकिंग पुढील वर्षीपासून सुरू होईल. या सफारी लॉजचे फोटो व्हायरल होत आहेत. यात लोकांना जिराफ आणि गेंड्यासोबत रात्र घालवण्याची संधी मिळेल. यात एका गेंड्यासोबत चार लोक एकावेळी एका झोपडीत राहू शकतात. यात ओपन लिव्हिंग एरिया आणि बाल्कनीही दिली जाईल. याच्या डिझाईनचे फोटो समोर आले असून लोकांना आकर्षित करत आहेत. एकाचा स्टंट दुसऱ्याला पडला महागात; मानेवर येऊन कोसळला युवक अन्..., VIDEO ही मॉर्डन हायटेक झोपडी अनेक फ्लोअर्समध्ये बनवली जाईल. याच्या पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम आणि एक बाथरूम असेल. याच्या बाल्कनीतून तुम्ही प्राण्यांना पाहू शकता. जे लोकांना जिराफासोबत रात्र घालवायची असेल त्यांच्यासाठी वेगळी झोपडी बनवली गेली आहे. यात तबल्ल आठ जिराफ असतील. या लॉजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचं जेवण दिलं जाईल. हत्तींचाही यात समावेश करून घेण्याचं काम सुरू आहे. या लॉजमध्ये राहण्यासाठी लोक अतिशय उत्सुक आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: