मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एकाचा स्टंट दुसऱ्याला पडला महागात; मानेवर येऊन कोसळला युवक अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एकाचा स्टंट दुसऱ्याला पडला महागात; मानेवर येऊन कोसळला युवक अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीला अंदाजही नव्हता की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे.

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीला अंदाजही नव्हता की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे.

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीला अंदाजही नव्हता की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. काही लोक तर फोटो आणि व्हिडिओला भरपूर लाईक आणि कमेंट मिळाव्या यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात दिसतं, की एका मुलाला स्विमिंग पुलमध्ये स्टंट (Stunt in Swimming Pool) करणं चांगलंच महागात पडलं. स्टंट करणाऱ्या मुलाला काही झालं नाही मात्र त्याला सपोर्ट करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची मान तुटता तुटता वाचली. हा व्हिडिओ पाहताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत, VIDEO

हा व्हिडिओ स्विमिंग पुलमध्ये शूट केला गेला आहे. यात पाण्यात उभा असलेला एक व्यक्ती एका मुलाला आपल्या खांद्यावर चढण्यासाठी मदत करत आहे. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीला अंदाजही नव्हता की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे. स्टंट करणारा मुलगा पाण्यात उभा असलेल्या मुलाच्या खांद्यावर चढून ब्लॅक फ्लिप मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इथेच गडबड होते.

बॅक फ्लिप (Back Flip) मारण्याच्या नादात या मुलगा पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर पडला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीची मान कशा पद्धतीनं वळते. व्हिडिओ इथेच संपतो. पाण्यात उभा असलेल्या व्यक्तीची अवस्था कशी आहे किंवा त्याला किती मार लागला, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी या व्यक्तीसाठी चिंता व्यक्त केली आहे.

पहिल्यांदाच सासरी आलेल्या तरुणाचं मेव्हणीने असं केलं Welcome; VIDEO पाहून म्हणाल

केवळ 10 सेकंदाचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेख नूर नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ 73 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण या व्यक्तीची मान तुटली असल्याचा अंदाज लावत आहेत.

एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की मी दावा करतो, या व्यक्तीची मान तुटली असणार. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट केली, हा कुठूनही मला विनोदी व्हिडिओ वाटत नाहीये. त्या व्यक्तीला खूप जोरात लागलं आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video