• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दुचाकीवर उभा राहून हायवेवर करत होता स्टंट; इतक्यात तोल गेला अन्..., पाहा Shocking Video

दुचाकीवर उभा राहून हायवेवर करत होता स्टंट; इतक्यात तोल गेला अन्..., पाहा Shocking Video

काही लोकांना स्टंट करण्याची खूप क्रेझ असते. बऱ्याच वेळा लोक असे स्टंट करतात, जे पाहूनच अंगावर काटा येतो

 • Share this:
  नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : प्रत्येक बाईकरची (Biker) अशी इच्छा असते की त्याच्याकडे महागात महाग गाडी असावी. जेणेकरून संपूर्ण स्पीडनं ही गाडी पळवून स्टंट करता येतील. याच कारणामुळे ज्यांच्याकडे अशा बाईक असतात ते आपला जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट (Bike Stunt) करताना दिसतात. स्टंटबाजी करताना अनेकांचा जीवही जातो. मात्र, तरीही लोक असे स्टंट करत राहतात. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर (Stunt Video Viral on Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. एकाचा स्टंट दुसऱ्याला पडला महागात; मानेवर येऊन कोसळला युवक अन्..., VIDEO काही लोकांना स्टंट करण्याची खूप क्रेझ असते. बऱ्याच वेळा लोक असे स्टंट करतात, जे पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. कधीकधी लोक धोकादायक स्टंट करताना आपला जीव देखील गमावतात. असं असूनही लोक यातून धडा घेत नाहीत. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकसह बीच हायवेवर कसे स्टंट करत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका हायवेवरुन गाड्या जात आहेत. इतक्यात एक व्यक्ती फ्रेममध्ये दिसतो. तो बाईकवर उभा राहून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तोल गेल्यानं तो धाडकन रस्त्यावर कोसळतो. सुदैवानं दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीकडे तो न पडल्यानं दुर्घटना टळली. खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत, VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या बाईकरला सल्ला दिला आहे. एका यूजरनं लिहिलं, स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहात नाही. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, असे धोकादायक स्टंट करणं टाळायला हवं. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: