Home /News /viral /

8 वर्षांआधी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडसोबत आजही बोलतो हा व्यक्ती; कसं झालं शक्य?

8 वर्षांआधी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडसोबत आजही बोलतो हा व्यक्ती; कसं झालं शक्य?

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

जोशुआ बारब्यू यानं जेसिका परेरा हिचं जुनं फेसबुक अकाउंट, टेक्स्ट मेसेज आणि इतर काही माहिती टाकून बरोबर तिच्याप्रमाणेच उत्तर देणारं एक सॉफ्टवेअर तयार केलं

    नवी दिल्ली 26 जुलै: एका व्यक्तीनं आपल्या होणाऱ्या बायकोला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यानं एआय चॅटबॉटचा वापर केला आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचा आठ वर्षांपूर्वीच मृत्यू (Fiancee's Death) झाला आहे. कॅनडाच्या ब्रॅडफोर्डमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय लेखक जोशुआ बारब्यू याची होणारी पत्नी जेसिका परेरा हिचा 2012 मध्ये गंभीर आजारामुळे मृत्यू झाला. जोशुआ बारब्यू आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) अजूनही विसरू शकलेला नाही. मागील वर्षी तो प्रोजेक्ट डिसेंबर नावाच्या वेबसाईटसोबत जोडला गेला आणि 5 डॉलर खर्चून त्यानं एक नवं बॉट बनवलं. याला त्यानं जेसिका कर्टनी परेरा हिचं नाव दिलं. या बॉटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडबाबतची माहिती टाकल्यानंतर तो तिच्यासोबत बोलू लागला (Writer Brought Her Girlfriend Back as an AI Chatbot). जोशुआ बारब्यू यानं जेसिका परेरा हिचं जुनं फेसबुक अकाउंट, टेक्स्ट मेसेज आणि इतर काही माहिती टाकून बरोबर तिच्याप्रमाणेच उत्तर देणारं एक सॉफ्टवेअर तयार केलं. हे सॉफ्टवेअर लव्ह लेटरपासून कामासाठीचा टेक्स्टदेखील लिहू शकतं आणि हे समोरच्यासोबत शेअर करू शकतं. दिल तो बच्चा है! लग्नातच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जोशुआ बारब्यू यानं प्रोजेक्ट डिसेंबरबद्दल ऐकलं. ते आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचा वापर करून चॅट बॉट बनवतात. GPT-3 सॉफ्टवेअरवर चालणारं हे बॉट कोणत्याही प्रकारचे जुने टेक्स्ट मेसेज आणि रायटिंग स्किलचा वापर करून त्या व्यक्तीप्रमाणेच बोलू लागतं. इतकंच नाही तर त्याच व्यक्तीप्रमाणं लिहूदेखील लागतं. महामार्गावर तरुणांची फिल्मी स्टाईल भाईगिरी पाहिलात का? बघा LIVE VIDEO जोशुआनं जेसिकाचे अनेक मेसेज इनपुट म्हणून वापरले आणि मग तिच्यासोबत व्हर्चुअल व्हर्जनमध्ये बोलू लागला. मात्र, विशेषतज्ञांनी असा इशारा दिला आहे, की ही पद्धत धोकादायक ठरू शकते. या पद्धतीचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला जाण्याची शक्यता अधिक आहे. सोशल मीडियावर अपमानजनक किंवा आपत्तीजनक लेख लिहिण्यासाठीही याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Girlfriend, Viral news

    पुढील बातम्या