Home /News /viral /

Dil toh baccha hain! लग्नात पाहुण्यांसमोरच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

Dil toh baccha hain! लग्नात पाहुण्यांसमोरच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

बहुतेक नवऱ्या लग्नात अतिशय शांत बसलेल्या असतात. तर, काही मात्र लग्नातही मस्ती करत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे.

  नवी दिल्ली 26 जुलै: लग्न (Marriage) म्हणजे केवळ काही तासांचा नाही तर त्याआधीच्या अनेक महिन्यांच्या तयारीचा आणि मग ठरलेल्या दिवशी काही तासात होणारा कार्यक्रम आहे. लग्नात नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) यांच्याकडे सर्व उपस्थित पाहुण्यांचं लक्ष असतं. बहुतेक नवऱ्या लग्नात अतिशय शांत बसलेल्या असतात. तर, काही मात्र लग्नातही मस्ती करत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात या नवरीनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. डोळे बंद करून नवरीला KISS करायला गेला अन्..; नवरदेवाचा VIDEO पाहून पोट धरून हसाल इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मंडपात नवरदेव आणि नवरीसह इतरही अनेक लोक उपस्थित आहेत. नवरीबाई इथे शांतपणे बसलेली दिसत आहे. ती मंडपात आजूबाजूला पडलेली फुलं हवेमध्ये फेकत असल्याचं दिसत आहे. फुलांसोबत खेळणाऱ्या या नवरीबाईचा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. मात्र, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं गेलं आहे, की ही लग्नाची शूटिंग सुरू आहे.
  View this post on Instagram

  A post shared by :) (@angelrai07__.__)

  नवरी आणि नवरदेव शूटींगसाठी ड्रेस-अप आहेत. मात्र, मंडपात पाहून असं अजिबातही वाटत नाही. नवरीप्रमाणे सजलेल्या तरुणीनं आपल्या या वेगळ्या अंदाजामुळे नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. नवरी अन् नवरदेवाची ही जोडी लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. एंजल रायनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअ केला आहे. बातमी देईपर्यंत 5 लाख 68 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Bridegroom, Marriage, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या