ठाणे येथे राहणारे व्यावसायिक हर्ष पांचाळ हे आपली स्कॉर्पिओ कार घेऊन कामानिमित्त वसई येथे आले होते. ते वसईतून पुन्हा आपल्या घरी परत जात असताना महामार्गावरील सातीवली खिंडीत एम एच 43 BU 0068 या अर्टिगा गाडीतून आलेल्या तीन ते चार अज्ञात तरुणांनी हर्ष यांना जबर मारहाण केली. केवळ ओव्हरटेक केल्याच्या वादातून भर रस्त्यात त्या तरुणांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांना मारहाण केली. हे तरुण एवढ्यावरच थांबले नाहीतर तर त्यांनी हर्ष यांच्या गाडीच्या बेसबॉल स्टिकनं काचा फोडल्या. हेही वाचा- धक्कादायक! दोन युवक बुडाले, आठवड्याभरात तब्बल 8 जणांचा बुडून मृत्यू महामार्गावर फिल्मी स्टाईलनं केलेल्या या गुंडांच्या भाईगिरीचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणांच्या या मारहाणीत हर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी या प्रकाराबाबत वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. पोलीस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तरुणांची फिल्मी स्टाईल भाईगिरी pic.twitter.com/UAu5KnzlVE
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral