मानवी वृत्तीनुसार आपल्याकडे चुका काढणं आणि निंदा करणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. मग ती एखाद्या माणसाची चुक असेल किंवा सरकारची. यात आता काही दिवसांत एका नव्या विषयावर चर्चा सुरू होईल, कोरोना नाही…तर रस्ते आणि त्यांवरील खड्डे. जून महिना म्हटलं की पावसाची लगबग असते, तशी रस्त्यांचीही असते. मग लागलीच रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता, असा मस्करी वजा टोमणाही लगावतो. मात्र खाली दिलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला रस्त्यावरचे खड्डेही बरे वाटू लागतील. आयएफएस सुधा रामेन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याच देशाताली अशा भागांतील रस्ते त्यांनी दाखवले जिथून खाली थेट मृत्यू दिसतो. हिमालयातील खोऱ्यांमधील या रस्त्यावरचा प्रवास हा थरारक असतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला पहिला प्रश्न पडेल तो म्हणजे, हा रस्ता आहे? तर याचे उत्तर हो आहे. वाचा- मनाला चटका लावणारी 46 सेकंद! हा VIDEO पाहून तुम्हाला कळेल मजूरांची खरी अवस्था
हा व्हिडीओ काहींनी उत्तराखंडचा आहे असे म्हटलं आहे तर काहींनी नेपाळचा. मात्र हा रस्ता एवढा अरुंद आहे की खाली थेट दरी दिसते. वाचा- नवरा बायकोच्या भांडणाचं कारण Google maps, पतीने पोलिसात घेतली धाव
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दररोज लोकं कसा प्रवास करतील याचा अंदाज येईल. तर, अशा रस्त्यांपेक्षा खड्डे बरे, असाही विचार काही लोकांच्या मनात आला. वाचा- VIDEO : कार थांबवून सुरू होतं फोटोशूट, अचानक सिंहीणीनं उघडला दरवाजा आणि…