मुंबई, 22 मे : कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान सिंहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सावलीमध्ये विश्रांती घेत असलेल्या सिंहाचे फोटो काढण्यासाठी कार थांबवली जाते आणि त्यावेळी या कारमधील लोकांसोबत एक दुर्घटना घडते असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंहाचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या अगदी जवळ कार थांबवण्यात आली. या कारमधून त्यांची छायाचित्र टिपत असताना अचानक सिंहीण उठून त्या कारजवळ आली. एवढ्या जवळून सिंहीण बघण्याचा एका आनंद होता पण भीतीही तेवढीच वाटत होती. या सिंहीणीनं कारजवळ जवळ जाऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला. कारमधील महिलेला काहीच सुचेना आणि पुढच्या काही सेकंदात सिंहीणीनं कारचं तोंडानं दार उघडून त्यांच्यावर हल्ला केला.
हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात याठिकाणी 600 टक्क्यांनी वाढली सायकलची मागणी, वाचा कारण
Nothing, She closed the door on time.. full video is available on YouTube.
— Raj (@phutt_) May 21, 2020
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 10.1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 150 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला घेऊन अनेक प्रतिक्रिया युझर्सनी व्यक्त केला आहेत. या महिलेची चूक आहे. ती सिंहांच्या एवढ्या जवळ गेल्यामुळी ही दुर्घटना घडली असल्याचंही एका युझरनं म्हटलं आहे. हे वाचा- Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला घेतेय काळजी हे वाचा- रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचं मांस खाताना दिसला तरुण, काय आहे VIDEO मागची कहाणी संपादन- क्रांती कानेटकर

)







