नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : जगातील सर्वात मोठ्या मगरीचा मृत्यू झाला आहे, जिचं नाव गिनीज बुकमध्येही नोंदवलं गेलं होतं. लोलोंग नावाच्या या मगरीने 2012 साली वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता आणि तेव्हा ही जगातील सर्वात मोठी मगर होती. मात्र यानंतर सुमारे दहा वर्षांनी आता या मगरीचा अजब कारणामुळे मृत्यू झाला आहे (World’s Largest Crocodile Dies). डेली स्टारच्या वृत्तानुसार, या मगरीला फंगल इन्फेक्शन झालं होतं. सोबतच तणाव हेदेखील या मगरीच्या मृत्यूचं कारण मानलं जात आहे. खाऱ्या पाण्यातील सर्वात मोठी मगर मानल्या जाणाऱ्या लोलोंगने एका शाळेतील मुलाची आणि मासेमाराची शिकार केली होती. यानंतर साल २०११ साली या मगरीला कैद करण्यात आलं वेगात सुरू असलेला पंखा हाताने थांबवला; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास कैदेत असतानाच साल २०१२ मध्ये या मगरीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला देला. कारण तेव्हा ही जगातील सर्वात मोठी मगर होती, जिची लांबी जवळपास २१ फूट होती. मात्र दोन लोकांची शिकार केल्यानंतर मगरीला फिलिपिंसच्या एका पार्कमध्ये कैद करण्यात आलं, जेणेकरून लोक या मगरीपासून सुरक्षित राहावे. पार्कमध्ये कैद असताना या मगरीला पाहण्यासाठी अगदी लांबून पर्यटक येत असत. इतकी मोठी मगर पाहून सगळेच अवाक होत असे. कारण एवढी मोठी मगर सहसा पाहायला मिळत नाही. त्यामुळे पार्कमध्ये लोक या मगरीची विशेष काळजी घेत असत.
बंद खोलीत येताच नवरीबाईने सोडली ‘लाज’, कॅमेरा ऑन करत केलं असं काम; VIDEO VIRAL
अधिकाऱ्यांनी सांगितलं की बऱ्याच काळापासून मगर आजारी होती आणि तिला फंगल इन्फेक्शन झालं होतं. सोबत तणाव हेदेखील या जीवाच्या मृत्यूचं कारण मानलं जात आहे. पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून मगरीने काही खाल्लंही नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की वातावरणातही वेगाने बदल होत असल्याने मगरीची प्रकृती आणखीच खालावत होती. आता या अनोख्या प्राण्याच्या मृत्यूमुळे लोक नाराज झाले आहेत. सोबतच अनेकांनी मगरीचे अवशेष म्यूझियममध्ये ठेवण्याची मागणीही केली आहे.