जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बंद खोलीत येताच नवरीबाईने सोडली 'लाज', कॅमेरा ऑन करत केलं असं काम; VIDEO VIRAL

बंद खोलीत येताच नवरीबाईने सोडली 'लाज', कॅमेरा ऑन करत केलं असं काम; VIDEO VIRAL

बंद खोलीत येताच नवरीबाईने सोडली 'लाज', कॅमेरा ऑन करत केलं असं काम; VIDEO VIRAL

लग्नात लाजण्याचं नाटक करून करून नवरीबाई इतकी कंटाळली की तिने बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर येत आपला असा व्हिडीओ बनवला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी : नवरी म्हटलं की गालातल्या गालात हसणारी, लाजणारी, हळूच नजर वर करून पाहणारी. भले महिला कितीही बिनधास्त असली तरी आपल्या लग्नात मात्र खोटंखोटं हा होईना पण सलग चेहऱ्यावर हास्य ठेवावं लागतं आणि लाजत राहावं लागतं. असंच खोटं लाजून एक नवरीबाई इतकी वैतागली की बंद खोलीत येऊन तिने आपली लाजच सोडून दिली असं म्हणायला हरकत नाही. लग्नात सर्व पाहुण्यांसमोर लाजणारी नवरी एका बंद खोलीत आली आणि त्यानंतर तिने असं काही केलं की तुम्हीही हैराण व्हाल. कॅमेरा ऑन करून तिने कॅमेऱ्यासमोरच जे काही करायचं ते केलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. brides_special नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही लाजणाऱ्या नवरीची पोझ देऊन थकता आणि नंतर तेसुद्धा तुम्हाला शक्य होत नाही, असं कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आलं आहे. हे वाचा -  चमत्कार! अख्खं कुटुंबच जुळं; जुळ्या दाम्पत्यांची मुलंही दिसतात Same to same व्हिडीओत पाहू शकता नवरी लाल रंगाच्या लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. ती ज्या खोलीत आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद आहे. त्यानंतर ती कॅमेऱ्यासमोर येते आणि चक्क डान्स करू लागते. तसं नवरीबाईचा डान्स तुमच्यासाठी काही नवा नाही. म्हणजे आता बऱ्याच नवरी आपल्या लग्नाच डान्स करताना दिसतात. पण या नवरीचा डान्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

जाहिरात

ढोलच्या तालावर बेधुंद होत ही नवरीबाई डान्स करते. तिच्या काही खास डान्स स्टेप्स नाहीत. म्हणजे ती जसं वाटेल तसं मनसोक्त नाचताना दिसते. वरातीत जसे काही लोक विचित्र पद्धतीने नाचताना दिसतात अगदी तशीच ही नवरीबाई नाचते. तिचा हा हटके डान्स आणि बिनधास्त अंदाज सर्वांनाच आवडला आहे. हे वाचा -  100 वर्षाचे आजोबा चढले बोहल्यावर; लग्नाची ही आगळीवेगळी कथा एकदा वाचाच नवरदेवानेच सर्व मस्ती का करावी? न लाजणाऱ्या नवरीला भेटा, जी सुपर एंटरटेनर, हसमुख आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारी आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात