नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक आजकाल कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासाठी अनेकदा ते जीवघेणे स्टंटही करतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरतात. हे व्हिडिओ (Viral Stunt Video) अतिशय रोमांचक असल्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी ठरतात आणि यामुळेच अगदी कमी काळातच व्हायरल होतात. आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव; सर्वांसमोरच करू लागला असं काम की नवरीही लाजली, Video सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ आपल्याला बालपणीच्या सरकारी शाळेतील पंख्याची आठवण करून देतो. सरकारी शाळांमध्ये मस्ती करताना काही मुलं शाळेतील पंख्याचं ब्लेड पकडून ते वळवत असत. यामुळे अनेकदा प्रत्येक वर्गातील पंख्याची डिझाईन वेगळी दिसत असे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असं काहीही नाही मात्र यात एक मुलगा फिरता पंखा आपल्या हाताने थांबवताना दिसतो.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या पंख्याच्या खाली उभा असलेला दिसत आहे. अचानक तो आपला हात वरती करून पंख्याची एक पाती पकडतो आणि चालू पंखा थांबवतो. मुलाने ज्या पद्धतीने पंखा बंद केला, ते पाहून सगळेच हैराण झाले. मात्र अशा प्रकारचे स्टंट करणं अतिशय घातक आहे. सध्या काही लोक हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हणत आहेत. तर, काहींनी हा रिव्हर्स व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. Video : गर्दीच्या रस्त्यावर एकाच वेळी 2 बाईक चालवत होता तरुण; विश्वास बसत नाही? हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बातमी देईपर्यंत 13 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 1 मिलियनहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. या मुलाने ज्या पद्धतीने फिरता पंखा बंद केला, ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत.