नवी दिल्ली, 28 मार्च : काही महिन्यांपूर्वी भारतात श्वानांच्या हल्ल्यांच्या बऱ्याच घटना घडल्या. यावेळी पिटबुल हा श्वान चर्चेत आला. पिटबुलने माणसांवर हल्ला केल्याची, पिटबुलच्या हल्ल्यात मृत्यूची प्रकरणंही समोर आली. पिटबुल हा जगातील सर्वात खतरनाक श्वानांपैकी एक. याच खतरनाक श्वानाला घेऊन एक तरुण डॉग शोमध्ये पोहोचला आणि तिथं भयंकर घडला. एका डॉग शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक तरुण या डॉग शोमध्ये खतरनाक पिटबुल श्वानाला घेऊन आला आणि त्यानंतर या श्वानाने या शोमध्ये धुमाकूळ घातला. @Texas_Made956 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एक व्यक्ती डॉग शोमध्ये पिटबुल श्वानाला घेऊन आला. त्यानंतर पुढे जे काही सांगण्याची गरजच नाही, असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. हल्ल्याचा हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल. असं या श्वानाने काय केलं आहे ते पाहुयात वाघ-सिंहाचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला श्वान; फायटिंगचा शेवट VIDEO मध्येच पाहा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक काळ्या रंगाचा श्वान जो पिटबुल आहे. एका तरुणाच्या हातात हा श्वान आहे, त्याने दुसऱ्या श्वानावर हल्ला केला आहे. त्या श्वानाचा मागचा भाग त्याने आपल्या जबड्यात धरला आहे. ज्या श्वानावर हल्ला झाला आहे, तो मोठमोठ्याने ओरडतो आहे. त्याच्या मालकिणीने त्याला आपल्या हातात घट्ट धरलं आहे आणि त्याला पिटबुलच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते आहे.
इतके लोक त्या श्वानाला पिटबुलपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो काही सोडत नाही आहे. अखेर पिटबुल त्या श्वानाला महिलेच्या हातातून खेचून घेतो. महिला त्याच्यामागे धावत जाते. कसंबसं करून अखेर तो श्वान पिटबुलच्या तावडीतून सुटतो. पिटबुलचा मालकही पिटबुलला मारताना दिसतो आहे. भारतातील या गावात श्वानही करोडपती; फुकटात काहीच खात नाहीत, अशी करतात कमाई डॉग शोमध्ये आलेल्या पिटबुले इतर श्वानांवर हल्ला करायला सुरुवात केली. दुसऱ्या श्वानांचा शिकार करण्याचा प्रयत्न त्याने केला.
ही घटना कुठली आणि कधीची आहे हे माहिती नाही. पण खूपच धक्कादायक आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.