श्रीमंत कुत्रा म्हटलं की तुम्हाला एंटरटेन्मेंट ही बॉलिवूड फिल्म नक्कीच आठवली असेल. जगातही असे काही श्वान आहेत, ज्यांचे मालक त्यांना अगदी आपल्या मुलांसारखं जपतात. पण भारतातील एक असं गाव जिथं एक-दोन नव्हे तर तब्बल 70 श्वान करोडपती आहेत.
या गावातील श्वान मालकाच्या किंवा कुणा दुसऱ्याच्या जीवावर जगत नाहीत. तर स्वतःच्या कमाईचं खातात. हे श्वान काय काम करतात, कशी कमाई करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
श्वानांची देखभाल करणाऱ्या एका ट्रस्टमध्ये राहणारे हे श्वान आहेत. जे एका जमीनदार आहेत, हो बरोबर वाचलं ते जमीनदार आहेत.
मढ नी पती कुतरिया ट्रस्ट असं या संस्थेचं नाव, या संस्थेला 70 वर्षांपूर्वी 21 बीघा जमीन दान म्हणून मिळाली.
दरवर्षी या जमिनीवर शेती करण्यासाठी लिलाव केला जातो. जो सर्वाधिक बोली लावतो, त्याला वर्षभर ही जमीन शेतीसाठी दिली जाते, जमिनीच्या लिलावातून ट्रस्टला दरवर्षी लाखो रुपये मिळतात.
हे गाव बायपासजवळ आहे. त्यामुळे इथल्या जमिनीचे दर खूप आहेत. एक बीघा जमिनीची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. त्यानुसार एकूण जमिनीचे 70 श्वानांना प्रत्येकी एक कोटी रुपये येतात.
ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल म्हणाले, 70 वर्षांपूर्वी ट्रस्टला ही जमीन दान म्हणून मिळाली. त्याची किंमत इतक्या कोट्यवधीपर्यंत पोहोचलेल असं कुणाला वाटलं नव्हतं. पण आता ही दानाची जमीन आहे त्यामुळे ती परत करता येत नाही.
त्यामुळे आजही ही जमीन ट्रस्टकडे आहे आणि त्यामुळे श्वान करोडपती बनत आहेत. हे करोडपती श्वान आहेत, ते गुजरातच्या मेहसाणामधील पंचोट गावात. (सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य - Canva)