• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: अरे हे काय! मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding, पाहा नवरीची प्रतिक्रिया

VIDEO: अरे हे काय! मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding, पाहा नवरीची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. यात पाहायला मिळतं, की नवरदेव हातात मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन आपल्या लग्नाच्या मंडपातून काम करत आहे.

 • Share this:
  मुंबई 24 जुलै : 2020 मध्ये देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार होण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेकांनी लग्नसमारंभ (Marriage Function) किंवा इतर मोठे कार्यक्रम पुढे ढकलले, तर अनेकांनी साध्या पद्धतीनंच आणि कमी लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम केले. अशात महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) पर्याय उपलब्ध करून दिला. याचा असाही फायदा झाला की जर तुम्हाला काही आवश्यक काम अचानक करावं लागलं, तर सुट्टी घेण्याचीही गरज नाही, कारण तुम्ही कामाच्या मध्येही थोडा ब्रेक घेऊन ते करू शकता. मात्र, तुम्ही असा विचार करू शकता का, की वर्क फ्रॉम होममध्ये ऑफिसचं काम करत लग्नही केलं जाऊ शकतं? VIDEO : पुरात अडकलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना NDRF च्या पथकामुळे जीवदान सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. यात पाहायला मिळतं, की नवरदेव हातात मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन आपल्या लग्नाच्या मंडपातून काम करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसू आलं आहे. तर, अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत.
  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव मंडपात खाली बसलेला आहे. लग्नातील कार्यक्रम (Wedding Rituals) सुरू आहेत आणि नवरदेव आपल्या ऑफिसच्या कामात व्यग्र आहे. मंडपातच हा नवरदेव आपला लॅपटॉप (Laptop) उघडून बसला आहे. तर, दूर बसलेली नवरीबाई नवरदेवाकडे पाहून हसत आहे. नवरदेवाला मंडपात काम करताना पाहून नवरीनं दिलेली रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. ती इच्छा असूनही आपलं हसू आवरू शकली नाही. नवरदेवाच्या शेजारीच लग्नाची संपूर्ण तयारी सुरू आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट अन्...; पाहा घटनेचा थरारक VIDEO हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर dulhaniyaa नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. काही वेळात हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. एका यूजरनं लिहिलं आहे, की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावरच कामाचं खूप प्रेशर आहे तर जरा हे पाहा...! तर, दुसऱ्या एकानं लिहिलं, की जेव्हा बॉस तुमची एक्स असते आणि तुम्ही तिला तुमच्या लग्नाबद्दल सांगितलेलं नसतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: