पालघर 24 जुलै : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार (Heavy Rain in Maharashtra) माजवला आहे. या पावसानं गेल्या दोन दिवसात अनेक बळीही घेतले आहेत. मात्र, भरपावसात महावितरणाचे दोन कर्मचारी पालघर (Palghar) येथील नदीवरुन जाणाऱ्या हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायरच्या दुरुस्तीसाठी गेले. अशात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं हे दोन्ही कर्मचारी वरच अडकले. अखेर स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या (NDRF) मदतीने या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश (Rescue Operation) आलं आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील (Video) समोर आला आहे.
पालघर : नदीमध्येच अडकले महावितरणाचे कर्मचारी pic.twitter.com/6cEkjrQCCS
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2021
लसीकरण केंद्रावरच महिलांनी एकमेकींना अक्षरशः धुतलं; तुंबळ हाणामारीचा VIDEO
नदीमध्येच अडकले महावितरणाचे कर्मचारी ; NDRF च्या पथकामुळे मिळालं जीवदान pic.twitter.com/VLo449MuvU
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2021
पालघर : नदीमध्येच अडकले महावितरणाचे कर्मचारी ; NDRF च्या पथकामुळे मिळालं जीवदान pic.twitter.com/30iTV1UOaG
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2021
वीज पुरवठा विभागात काम करणारे मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाल बंद वीज सुरू करण्यासाठी विद्युत तारेने सुरक्षा पट्ट्यावर लटकून नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, नदीच्या दोन काठांमधील लांब पल्ल्याच्या अंतरामुळे हे दोन्ही कर्मचारी नदीच्या मध्यभागी जाऊन वायरमध्ये अडकले. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच प्रशासनानं एनडीआरएफच्या मदतीनं या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर या प्रयत्नांना यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Monsoon, Palghar, Rain flood