Home /News /viral /

प्रेयसीनं सिक्रेट ठिकाणी गोंदवला BF च्या नावाचा टॅटू; पण पाहताच तरुणानं तोडलं नातं

प्रेयसीनं सिक्रेट ठिकाणी गोंदवला BF च्या नावाचा टॅटू; पण पाहताच तरुणानं तोडलं नातं

मेगन हिनं आपल्या प्रियकराच्या नावाचा टॅटू गोंदवण्याआधी आठ महिने त्याला डेट केलं. यानंतर दोघांनीही मॅचिंग टॅटू गोंदवण्याचा निर्णय घेतला

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : प्रेम (Love) ही एक अशी भावना आहे ज्यात लोक आपल्या जोडीदाराला (Partner) आनंदी ठेवण्यासाठी काहाही करायला तयार असतात. यातून आपल्या जोडीदाराला खूश करायचं आणि आपलं प्रेम व्यक्त करायचं असा यामागचा उद्देश असतो. मात्र, पार्टनरसाठी काहीही करण्याआधी एकदा या गोष्टीची खात्री नक्की करून घ्या की समोरचा व्यक्तीही तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो का. कारण, असं नसल्यास भविष्यात तुम्हाला पश्चातापाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या पार्टनरच्या भावना जाणून न घेताच इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या मेगन हिनं प्रियकराच्या (Lover) नावाचं पहिलं अक्षर टॅटू (Tattoo) म्हणून गोंदवून घेतलं. मात्र, यानंतर जे काही घडलं त्यामुळे मेगनला मोठा धक्का बसला. मेगननं आपल्या बिकनी एरियामध्ये टॅटू गोंदवून घेतला होता. मात्र, हा टॅटू बघताच तिच्या पार्टनरनं तिच्यासोबत ब्रेकअप केला. टॅटू गोंदवल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं नातं तुटलं. मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली USB केबल, अवस्था पाहून डॉक्टरही शॉक मेगन हिनं आपल्या प्रियकराच्या नावाचा टॅटू गोंदवण्याआधी आठ महिने त्याला डेट केलं. यानंतर दोघांनीही मॅचिंग टॅटू गोंदवण्याचा निर्णय घेतला. मेगनचं असं म्हणणं आहे, की तिच्या या प्रियकरानं तिला सांगतिलं होतं की आपल्या दंडावर तो मेगनच्या नावातील एम गोंदवेल. यानंतर मेगननं आपल्या प्रियकराला सरप्राईज देण्यासाठी बिकनी एरियामध्ये टॅटू गोंदवण्याचा निर्णय घेतला. मेगनला वाटलं, की हा टॅटू पाहून तिचा बॉयफ्रेंड आनंदी होईल. टॅटू गोंदवल्यानंतर दोन आठवड्यातच मेगनला तिच्या प्रियकराचा मेसेज आला. यात त्यानं ब्रेकअपबाबत लिहिलं होतं. मेगननं सांगितलं, की त्या दोघांमध्ये आधीही वाद होत असे. 19 वर्षीय मेगनला असं वाटत असे, की याच मुलासोबत ती आपलं संपूर्ण आयुष्य जगणार आहे. यामुळे तिनं आपल्या बिकनी लाईनवर आपल्या प्रियकराच्या नावाचं पहिलं अक्षर जे लिहिलं होतं. मात्र, यामुळे प्रेम वाढण्याच्या ऐवजी त्यांचं ब्रेकअप झालं. हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ मेगननं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडनं पहिल्यांदा हा टॅटू पाहिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया एकदम नॉर्मल होती. यानंतर दोघांमध्ये याबाबत काही चर्चाही झाली नाही. मेगनला वाटलं, की कदाचित तिच्या बॉयफ्रेंडला हा टॅटू पाहून धक्का बसला होता, त्यामुळे त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता तिनं लोकांना सल्ला दिला आहे, की कधीच असा काही निर्णय घेऊ नका. विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्या नात्याची काहीच खात्री नसेल. आता मेगनला आपल्या या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Breakup, Love story

    पुढील बातम्या