मराठी बातम्या /बातम्या /Viral /Women Safety: रात्री उशारा प्रवास करणं ठरु शकतं धोकादायक, 'या' सुरक्षा टिप्स महिलांच्या कामाच्या

Women Safety: रात्री उशारा प्रवास करणं ठरु शकतं धोकादायक, 'या' सुरक्षा टिप्स महिलांच्या कामाच्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एकटीनं प्रवास करताना महिलांनी या टिप्स पाळाव्या, ज्याच्या मदतीने तुम्हाला परिस्थितीशी येईल लढता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 28 सप्टेंबर : सध्या महिलांवरील गुन्ह्यांची इतकी प्रकरणं समोर येऊ लागली आहेत की, आता महिलांना कामासाठी घराबाहेर पडणे आणि एकटीने प्रवास करण्याची भीती वाटू लागली आहे. मुलीच काय तर त्यांचे आई-वडिल देखील आपल्या मुलींना बाहेर पाठवण्यापासून घाबरू लागले आहेत. या प्रकरणांना कुठे तरी आळा बसलाच पाहिजे. परंतू मुलींनी देखील अशा गोष्टींना घाबरण्याची गरज नाही, कारण तशीच जर वेळ आली तर तुम्ही घाबरुन न जाता यासगळ्याशी लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी तुम्ही ठेवायला हवी.

ज्यामुळे तुम्हाला अशावेळी लढता येईल. तसचे आम्ही तुम्हाला अशा काही सेफ्टी टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला परिस्थितीशी लढता येईल.

नेहमी सतर्क रहा

जरी ऑफिस कॅब सुरक्षित वाटत असली तरी देखील तुम्हाला नेहमी सतर्क राहाण्याची गरज आहे कारण कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. तसेच तुम्ही प्रायवेट कॅब बुक केली तरी नेहमी मोबाईल जवळ ठेवा, तुमच्या मार्गांवर लक्ष ठेवा आणि मॅप तुमच्याकडे खुला ठेवा. कॅबमध्ये झोपणे अजिबात सुरक्षित नाही, म्हणून शुद्धीवर राहा. कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहा किंवा त्यांना सतत सांगा की तुम्ही कुठे पोहोचला आहात.

हे वाचा : बराच वेळ कामामुळे डोळे, डोकं दुखतंय? पेनकिलरशिवाय Exercise ने दूर करा वेदना

आपत्कालीन क्रमांक स्पीड डायलवर ठेवा

सुरक्षेसाठी महिलेजवळ हेल्पलाइन आणि पोलिस क्रमांक असणे अत्यंत गरजेचे आहे. महिला हेल्पलाइन तत्काळ संरक्षण देऊ शकतात. याशिवाय स्पीड डायलमध्ये तुम्ही काही नंबर टाकू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींचा आणि ऑफिसमधील वरिष्ठ आणि मदतनीस सहकाऱ्यांचा नंबर टाकू शकता. स्पीड डायलमध्ये 5-6 नंबर असणे आवश्यक आहे.

हे वाचा : Chankya niti : गर्दीत पुरुषांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात महिला, तुम्हाला त्या माहितीय का?

ही सुरक्षा साधने तुमच्याकडे ठेवा

सुरक्षिततेसाठी, काही सुरक्षा उपकरणे वापरली जाऊ शकतात. तसेच पेपर स्प्रे आणि धारदार गोष्टी सोबत ठेवा. तसेच त्या हातात लगेच येईल अशा ठेवा. ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे लोकेशन कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा आणि त्यांना तुम्ही कसे घरी येता, म्हणजेच तुमच्या मार्गांबद्दल सांगा.

एकटे जाणे सुरक्षित नाही

जर तुम्ही ऑफिस कॅबशिवाय जात असाल तर एकटे जाणे सुरक्षित नाही. कौटुंबिक सदस्याला ऑफिसजवळ बोलवा किंवा विश्वासू सहकाऱ्यासोबत घरी जा. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही कोणासोबत जात आहात, याची माहिती दिली तर तुम्ही सुरक्षितता राहाल. तसेच एकट्याने जाताना निर्जन रस्त्यावर जाणे टाळावे.

रात्रीची शिफ्ट टाळा

शक्यतो रात्रीची शिफ्ट टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत, तुम्हाला रोज असुरक्षित वाटत असेल तर ऑफिसमध्ये तुमच्या समस्या सांगा, यावर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल.

First published:
top videos

    Tags: Marathi news, Viral news, Women safety, Women security