मुंबई 25 सप्टेंबर : आचार्य चाणक्य आणि त्यांच्या नीतिबद्दल तुम्ही अनेक कथा कहाण्या ऐकल्या असतील, खरंतर ते एक उत्तम राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांना भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल देखील बरीच माहिती आहे, ज्यामुळे त्यांनी खूप पूर्वीपासून लोकांना याबद्दल इशारा देण्यास सुरुवात केली आणि खरंच त्यांच्या या नीतिचा लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप फायदा झाला आहे. आचार्य चाणक्याने आपल्या धोरणांच्या बळावर चंद्रगुप्त मौर्यासारख्या साध्या मुलाला सम्राट बनवले. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत ज्यामध्ये आपण जीवनात यश कसे मिळवू शकतो हे सांगितले आहे. जर एखाद्याने चाणक्य नीतीचे पालन केले तर तो सर्वात कठीण समस्या देखील सोडवू शकतात, चाणक्य नीतीमध्ये आपण इतरांना आपल्याकडे कसे आकर्षित करू शकतो हे देखील सांगितले आहे, म्हणूनच तर अनेक लोक चाणक्य नीती आजही फॉलो करतात. बऱ्याच पुरुषांची अशी तक्रार असते की, त्यांनी काहीही केलं, अगदी कितीही प्रयत्न केला तरी महिला त्यांच्या मनात काय विचार करतात हे कळत नाही, तर अशा लोकांसाठी आज आम्ही एक चाणक्या नीति घेऊन आलो आहोत, ज्याचा फायदा पुरुषांना होऊ शकतो. या नीतीमध्ये महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टी सर्वात आधी पाहातात आणि कसं आपलं मत बनवतात हे सांगण्यात आलं आहे, चला जाणून घेऊ. हे वाचा : Dream Day 2022 : या 9 गोष्टी स्वप्नात आल्या तर.. पाहा काय असतो तुमच्या स्वप्नांचा अर्थ चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की सार्वजनीक ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमात महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतात. चाणक्य नीतीनुसार महिलांना पुरुषांची प्रामाणिकता लगेच लक्षात येते. स्त्रिया प्रामाणिक असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे कधीही फसवणूक करत नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की, महिलांना असे पुरुष आवडतात जे त्यांचं लक्षपूर्वक ऐकतात. चाणक्य नीतीनुसार, महिलांना हे बरोबर लक्षात येते की त्यांचे कोण लक्षपूर्वक ऐकत आहे. महिलांना त्यांचा जोडीदार असा असावा की त्यांना त्यांचे बोलणे ऐकून समजेल. महिलांना त्यांच्या जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडते. त्यामुळे त्यांना समजूतदार जोडीदार मिळाला तर बस्स…. हे वाचा : Fitness Tips : जिम की मोकळ्या हवेत; कोणत्या ठिकाणी Excercise करण्याचा अधिक फायदा? चाणक्य नीतीनुसार, महिला नेहमी लक्षात घेतात की पुरुष इतरांशी कसे वागतात. तो इतरांशी गैरवर्तन तर करत नाही ना? गोड बोलणारे पुरुष महिलांना खूप आवडतात. चाणक्य नीतीनुसार, महिलांना खोटे बोलणारे लोक अजिबात आवडत नाहीत. पुरुष त्यांच्याशी खोटे बोलत नाही याची महिला विशेष काळजी घेतात आणि त्यांची अनेकदा परिक्षा देखील घेतात, स्त्रियांना खरं बोलायला खूप आवडतं. त्यामुळे त्यांना सत्यवादी पुरुष आवडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.