मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बराच वेळ कामामुळे डोळे, डोकं दुखतंय? पेनकिलरशिवाय Exercise ने दूर करा वेदना

बराच वेळ कामामुळे डोळे, डोकं दुखतंय? पेनकिलरशिवाय Exercise ने दूर करा वेदना

असं मन ठेवा शांत

असं मन ठेवा शांत

जागी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर बसून काम केल्यामुळे डोळ्यांवर सर्वांत जास्त ताण येतो. परिणामी डोकंदुखी उद्भवते.

मुंबई,  22 सप्टेंबर : सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात कामाच्या वेळा अनियमित आहेत. बराच वेळ आणि तेही ऑफिसमध्ये एका जागी कम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर बसून काम केल्यामुळे शारीरिक समस्या उद्धभवतात आणि मानसिक ताणही येतो. शारीरिक ताणाचा विचार केल्यास डोळ्यांवर सर्वांत जास्त ताण येतो. (Precautionary Measures for Eyes) कामाच्या ताणामुळे काही जणांना अर्धशिशीचा (Migraine) त्रासही होतो. सतत लॅपटॉप आणि स्मार्टफोनमध्ये बघून काम केल्याने ताण येतो असं संशोधनातूनही सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत बसल्या जागीच काही साधे-सोपे व्यायाम किंवा काही कृती केल्यास ताण हलका व्हायला मदत होते. योग डोळ्यांची निगा राखणं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा तोल ढळू नये म्हणून योग उपयुक्त ठरतो. खुर्चीत बसल्या-बसल्या पाय शरीराच्या रेषेत आणून नीट बसावं. यानंतर दोन्ही हातांच्या मुठी बंद करून अंगठे मोकळे ठेवावेत. असं केल्यावर आपल्या समोर असलेल्या भिंतीवर किंवा समोरच्या सपाट पृष्ठभागावर एका ठिपक्यावर लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर आपली बुब्बुळं एका बाजूने दुसर्‍या बाजूला फिरवावीत. हे असं दोन-तीन वेळा केल्यास बुब्बुळांवर येणारा ताण कमी होतो. हाताच्या तळव्यांनी डोळे शेकणं जेव्हा आपण ऑफिसात लॅपटॉपसमोर बसून काम करतो, तेव्हा डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. यावर उपाय म्हणून दीर्घ श्वास घेऊन डोळे काही मिनिटांसाठी बंद करायचे. काही वेळ त्याच स्थितीत बसून राहावं. मग हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासावेत. ते गरम झाले, की ते आपल्या डोळ्यांवर ठेवून डोळे शेकावेत. हे केल्यावर लगेच फरक जाणवायला सुरुवात होईल. सलग काम करताना अधूनमधून काही मिनिटं काढून हा व्यायामप्रकार नक्कीच करणं शक्य आहे. डोळ्यांवर थंड पाण्याचा हबका डॉक्टरांकडून असा सल्ला दिल्ला जातो, की काम करताना मध्येच छोटा ब्रेक घेऊन डोळ्यांवर आणि तोंडावर थंड पाणी मारलं, तोंड धुतलं, तर ताजतवानं वाटून थकवा दूर होतो. काम करता करता मध्येच, तसंच काम संपवून घरी गेल्यावर तोंडावर/डोळ्यांवर गार पाण्याचा हबका मारल्यास किंवा गार पाण्याने तोंड धुतल्यास डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि डोळे चुरचुरणं थांबतं. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होऊन थकवा दूर होतो आणि ताजंतवानं वाटतं. एकटक समोर पाहणं खुर्चीत बसल्या जागी आपले पाय काहीसे मोकळे सोडून आरामात बसावं. त्यानंतर डाव्या हाताची मूठ करून अंगठा मोकळा ठेवून त्या डाव्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर काही वेळाने डाव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष केंद्रित करून डोळ्यांची बुब्बुळं हळूहळू वरच्या दिशेने नेऊन एका सर्वोच्च बिंदूवर लक्ष केंद्रित करावं. हे असं उजव्या हाताच्या अंगठ्याच्या साह्यानेही करावं. त्यामुळे डोळे आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर आलेला ताण कमी होतो आणि डोळ्याच्या शिरांना, स्नायूंना आराम पडतो. या छोट्या-छोट्या उपायांच्या साह्याने डोळ्यांचा ताण हलका होतो. डोकेदुखीही कमी होते. एकंदरीतच, सलग काही तास स्क्रीनकडे पाहत राहू नये, ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Pain, Stress

पुढील बातम्या