नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : अनेकांना खाण्या-पिण्याच्या गोष्टीत काही उटल-सुलट आढळलं तर त्यांची पुढे जेवणाची, खाण्याची इच्छाच उडते. अनेकदा पिज्झा, बर्गर, कोकच्या बॉटलमध्ये किडे आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाप्रकारचा आणखी एक प्रकार नुकताच समोर आला आहे. एका तरुणीला टोमॅटो पेस्टच्या ट्यूबमध्ये एक मेलेला उंदीर आढळल्याचं समोर आलं आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या मेओटी नावाच्या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने टोमॅटो पेस्टची ट्यूब विकत घेतली होती. ज्यावेळी तिने टोमॅटो पेस्टचं पाउच ओपन केलं त्यावेळी ट्यूबमधून मेलेला उंदीर भांड्यात आला. पण तरुणीने सांगितलेल्या या घटनेचं कंपनीने खंडन केलं असून त्यांनी असं होणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. कंपनीने टोमॅटो पेस्टची ट्यूब दोन मिलीमीटर फिल्टरिंग प्रोसेस फॉलो करुन तयार होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे अशा ट्यूबमध्ये मेलेला उंदीर सापडणं शक्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ब्राझीलच्या साओ डोमिंगोमध्ये राहणाऱ्या तरुणीने सांगितलं, की आता ती कधीही टोमॅटो पेस्ट खरेदी करणार नाही. या घटनेनंतर तिने आपल्या घराच्या मागे गार्डनमध्ये टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तरुणीने तिच्यासोबत घडलेली ही घटना अतिशय भितीदायक असल्याचं सांगितलं. ट्यूबमधून अचानक मेलेला उंदीर बाहेर भांड्यात आला. त्या महिलेने या ब्रँडच्या एकाहून अधिक ट्यूब खरेदी केल्याचं सांगितं. तसंच ही शेवटची ट्यूब होती. मोठ्या भांड्यात टोमॅटो सॉस बनवण्यासाठी ट्यूब ओपन केली होती आणि अचानक उंदीर बाहेर आल्याचं तरुणीने सांगितलं. या घटनेने मी पूर्णपणे हादरली असून हा प्रकार मी आई-वडिलांनाही दाखवला, जेणेकरुन त्यांना मी खोटं बोलत असल्याचं वाटू नये.
फ्रूट्स अलीमेंटो नावाच्या कंपनीने या तरुणीशी संपर्क केला आहे, जेणेकरुन टोमॅटो पेस्टची तपासणी केली जाईल. कंपनीच्या वकीलांनी सांगितलं, की पेस्टमध्ये कोणतीही बाहेरील गोष्ट जाणं शक्य नाही, कारण हे काम पूर्णपणे मशीनद्वारे होतं. तसंच यात कोणत्याही प्रकारची ह्यूमन अॅक्शन नसल्याने हे असं होणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.