मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Soup मध्ये प्लास्टिक मिळाल्याने महिलाचा संताप, रेस्टॉरंट मॅनेजरच्या चेहऱ्यावर फेकलं गरम सूप

Soup मध्ये प्लास्टिक मिळाल्याने महिलाचा संताप, रेस्टॉरंट मॅनेजरच्या चेहऱ्यावर फेकलं गरम सूप

रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यानंतर चांगलं सूप (soup) न मिळाल्याने एका महिलेने रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या (Restaurant Manager) चेहऱ्यावर गरम सूप फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यानंतर चांगलं सूप (soup) न मिळाल्याने एका महिलेने रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या (Restaurant Manager) चेहऱ्यावर गरम सूप फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यानंतर चांगलं सूप (soup) न मिळाल्याने एका महिलेने रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या (Restaurant Manager) चेहऱ्यावर गरम सूप फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

टेक्सास, 11 नोव्हेंबर : अनेकदा आपण रेस्टॉरंटमध्ये (restaurants) खाण्यासाठी जातो. बऱ्याच वेळा रेस्टॉरंटमधून विविध पदार्थांची (foods) ऑर्डरदेखील घरी केली जाते. पण भरभक्कम पैसे (money) देऊनही जेव्हा जेवण चांगलं मिळत नाही, तेव्हा खूप चिडचिड होते. पैसे तर जातातच पण जेवणही खराब मिळाल्याने खूप संताप होतो. अमेरिकेतल्या टेक्सास (Texas) येथे असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यानंतर चांगलं सूप (soup) न मिळाल्याने एका महिलेने रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या (Restaurant Manager) चेहऱ्यावर गरम सूप फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका महिलेने रेस्टॉरंट मॅनेजरवर गरम सूप फेकल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 7 नोव्हेंबरची आहे. संबंधित महिलेने सोल डी जॅलिस्को नावाच्या रेस्टॉरंटमध्ये फोन केला आणि सूपबद्दल तक्रार केली. यानंतर महिला रेस्टॉरंटमध्ये आली आणि मॅनेजरशी वाद घालू लागली.

महिला व मॅनेजर यांचा वाद एवढा टोकाला गेला, की रागाच्या भरात संबंधित महिलेने मॅनेजरवर गरम सूप फेकलं आणि लगेच घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकाराने मात्र मॅनेजर चांगलाच घाबरला. त्याने लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. मेल ऑनलाइन टुडेच्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटच्या मॅनेजरचं नाव जेनेल ब्रोलँड असं आहे. मात्र सूप फेकणाऱ्या महिलेबाबत पोलिसांना आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

VIDEO: 'आता ही पुन्हा कोरोना आणणार...', घराच्या छतावर विंचूची शेती करताना दिसली चायनीज मुलगी

दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सूप थंड झालं होतं. त्यामुळे मॅनेजरला दुखापत झाली नाही. रेस्टॉरंट मॅनेजर जेनेल ब्रोलँड यांनी सांगितलं, की त्यांना सूप गरम असल्याचं जाणवलं. डोळ्यात खूप जळजळ होत होती. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. या प्रकरणी सध्या पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

म्हणून फेकलं गरम सूप?

सूप फेकणाऱ्या महिलेने मॅनेजरसमोर आरोप केला, की जेव्हा तिने सूप प्यायला उचललं, तेव्हा ते इतकं गरम होतं, की त्यावरचं प्लास्टिकचं झाकण वितळलं होतं. यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने माफी मागितली आणि सूपचे पैसे परत करण्याची तयारी दाखवली. मात्र संबधित महिलेने संतापून शिवीगाळ करून सूप फेकलं आणि ती रेस्टॉरंटमधून निघून गेली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

" isDesktop="true" id="629377" >

रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर खराब अन्न मिळाल्यानंतर ग्राहक व रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांचे अनेकदा वाद होतात. हे वाद सोडवण्यासाठी बऱ्याच वेळा संबंधित ग्राहकाकडून बिल न घेणं, त्याला पैसे परत देणं, असे मध्यम मार्ग काढले जातात. अमेरिकेत मात्र रागाच्या भरात महिला ग्राहकाने रेस्टॉरंट मॅनेजरच्या चेहऱ्यावर सूप फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

First published:

Tags: America, Viral video.