Home /News /viral /

जगातल्या या ठिकाणी 100 वर्षांपासून एकही मृत्यू नाही, सरकारकडून मरणावर बॅन; सांगितलं हे कारण

जगातल्या या ठिकाणी 100 वर्षांपासून एकही मृत्यू नाही, सरकारकडून मरणावर बॅन; सांगितलं हे कारण

जगात एक असं ठिकाण आहे, जिथे सरकारने लोकांच्या मरणावर बॅन लावला आहे. या ठिकाणी 1917 मध्ये शेवटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजूनपर्यंत इथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : प्रत्येक जण जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. आयुष्य आणि मृत्यू या नैसर्गिक गोष्टी आहेत. मृत्यू कोणाच्याही हातात नाही. पण जर तुम्हाला सांगितलं, एक अशी जागा आहे जिथे मृत्यूसाठी सरकारची मर्जी असते? यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण जगात एक असं ठिकाण आहे, जिथे सरकारने लोकांच्या मरणावर बॅन लावला आहे. या ठिकाणी 1917 मध्ये शेवटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजूनपर्यंत इथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. हे ठिकाण नॉर्वेतील लॉन्ग इयरबेन (longyearbyen) इथे आहे. इथे मेपासून जुलैपर्यंत सूर्यास्त होत नाही. सलग 76 दिवसांपर्यंत सुर्योदय असतो. म्हणजेच इतके दिवस इथे रात्र होत नाही. यादरम्यान इथे अतिशय थंडी असते. याच ठिकाणी सरकारने लोकांच्या मृत्यूवर बॅन लावला आहे. यामागे एक खास कारणही सांगितलं जातं. नॉर्वेतील longyearbyen मध्ये कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे एखाद्याचं निधन झालं, तर मृतदेह पुरल्यानंतर तो कडाक्याच्या थंडीमुळे कुजत नाही. अशा परिस्थितीत मृतदेह शतकानुशतके तसाच पडून राहतो.

  Soupमध्ये प्लास्टिक मिळाल्याने महिलाचा संताप,रेस्टॉरंट मॅनेजरवर फेकलं गरम सूप

  इथे शेवटचा मृत्यू 1917 मध्ये झाला होता. इन्फ्लुएंजामुळे 1917 मध्ये त्या व्यक्तीचं निधन झालं होतं. त्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं. पण तिथे थंडी इतकी असते, की आतापर्यंत मृतदेह तसाच आहे. त्यामुळे बॉडीमध्ये अद्यापही इन्फ्लुएंजाचे व्हायरस तसेच आहेत. त्यानंतर सरकारने इथे मरणावर बॅन लावला. आता महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने बॅन लावला म्हणून मृत्यू होणं हे टाळता येतं का? ban on death जेव्हापासून या ठिकाणी मरणावर बॅन लावण्यात आला, तेव्हापासून येथील लोकांच्या मृत्यूआधीच त्यांना या ठिकाणाहून एका दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं.

  24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

  इथे राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली, तर त्याला लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. तिथे त्या व्यक्तीची देखभाल केली जाते. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Death, Viral news

  पुढील बातम्या