मुंबई 30 सप्टेंबर : सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ येथे पाहायला मिळतात की, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो खूपच ट्रेंडमध्ये आहे. तसे पाहाता भांडणं बघायला कोणाला आवडत नाही. अगदी रस्त्यापासून ते ट्रेनपर्यंत तुम्ही बऱ्याचदा भांडणं होताना पाहिलं असेल आणि असे अनेक लोक आहेत, ज्यांना ही अशी भांडणं पाहायला आवडतात आणि हा व्हिडीओ देखील तसाच आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये दोन मुली रस्त्यावरच भांडू लागल्या आहेत. त्या दोघांही फक्त तोंडाने भांडत नाहीयत तर या मुलीनी एकमेकीशी मारामारी करायला सुरुवात केली आहेत. हे पाहा : चोरांनी शिव मंदिरात चोरल्या सोनं-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच… पाहा Video त्यांची ही भांडणं इतकं पुढे गेलं आहे की आता ते कोणाचं ही ऐकायला तयार नाहीत, शिवाय या मुलींना विसर पडला आहे की त्या नक्की कुठे आहेत…
तुम्ही रस्त्यावर मुलांमध्ये अशी भांडणं होताना पाहिलं असेल, पण मुलींना असे भांडताना क्वचितच पाहिले असेल. म्हणूनच तर हा व्हिडीओ लोक जोरदार शेअर करत आहेत. या दोन्ही मुली एकमेकांना केसांनी पकडून एकमेकांना कानाखाली मारत आहेत, तसेच लाथा बुक्यांनी देखील त्या एकमेकींना मारत आहेत. हे पाहा : साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा… Video Viral हा @ViciousVideos या हँडलवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 15 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी त्याला लाइक देखील केलं आहे. सोबतच हा व्हिडीओ पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी मजेदार मीम्स शेअर करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.