मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोरांनी शिव मंदिरात चोरल्या सोनं-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच... पाहा Video

चोरांनी शिव मंदिरात चोरल्या सोनं-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच... पाहा Video

शिव मंदिरात चोरी करताना चोर

शिव मंदिरात चोरी करताना चोर

हे दोन चोर चोरी करण्यासाठी एका मंदिरात येतात. ते शंकराच्या पिंढीवरील साप, दागिने आणि जलकलश चोरतात. पण त्यांचा पुढचा प्लान मात्र फसतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 28 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांमध्ये काही चोरीचे व्हिडीओ देखील असतात. हे व्हिडीओ बऱ्याचदा आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. तसेच यामध्ये आपल्याला चोरांची चतुराई पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. ज्यामध्ये हे चोर आपली चतुराई वापरताना दिसत आहेत, पण तरी देखील ते त्यांच्या प्लानमध्ये सक्सेस होत नाहीत.

हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील आहेत. ज्यामध्ये दोन चोर हे चोरी करण्यासाठी एका मंदिरात येतात. ते शंकराच्या पिंढीवरील साप, दागिने आणि जलकलश चोरतात. पण त्यांचा पुढचा प्लान मात्र फसतो.

गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना मनुनिया गावातील मनुनिया महादेव मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये या दोन्ही चोरांचं तोंड संपूर्ण झाकलेले आहेत, तसेच त्यांनी हातमोजे घातले आहेत.

हे वाचा : बाईक चोरण्यात यश आले नाही म्हणून रागावलेल्या चोराचं विचित्र कृत्य! पाहा Viral Video

पण या चोरांची खरी नजर दानपेटीवर होती, मात्र त्यांना त्यात यश मिळू शकले नाही. हे चोर खूप प्रयत्न करतात परंतू या पेटीलाल लावलेले चार टाळे हे दोघेही फोडू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांचा तो प्लान तसा फसलाच.

@KashifKakvi नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'शिवाचा नाग आणि जलधारी चोरांना उडवली. मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिव मंदिरातील सीसीटीव्ही. मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांची नजर असली तरी दोन्ही चोरट्यांना दानपेटीचे कुलूप तोडता न आल्याने त्यांना त्यात यश आले नाही.'

हे वाचा : बँकेत टाकला सशस्त्र दरोडा, पण पैसे-सोन्याऐवजी असं काही लुटलं की...; VIDEO तुफान VIRAL

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी ता.नगर येथे संप पुकारला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी पोलिसांकडे या चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रशासन आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Shocking news, Videos viral, Viral news