मुंबई 29 सप्टेंबर : आपल्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. परंतू असे असले तरी देखील आजही भारतात अंधश्रद्धा आणि रुढी, परंपरेला अनेक लोक बळी पडले आहेत. अगदी सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धेच्या मागे वेडे होतात. खरंतर लोकांना श्रद्ध आणि अंधद्धा या दोन गोष्टींमधला फरकच कळत नाही. श्रद्धेमुळे लोकांना पॉझिटीव्हिटी मिळतेच, परंतू लोक त्याच्या इतकं आहारी जातात की मग आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्याबद्दल पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर एका व्यक्तीने साधूच्या सांगण्यावरुन समाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला जमिनीखाली 6 फूट गाडून घेतलं. साधूने त्या तरुणाला सांगितलं की, नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याने ‘समाधी’ घेतली तर त्याला आत्मज्ञान मिळेल. ही गोष्ट जेव्हा गावातील लोकांना कळली, तेव्हा त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर ते तरुणाला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याला तरुणाला या खड्यातून बाहेर काढलं. हे वाचा : चोरींनी शिव मंदिरात चोरल्या सोना-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच… पाहा Video या तरुणाला बचावाच्या मोहिमेच्या व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की पोलीस बांबूचे ढीग आणि बऱ्याच गोष्टी बाजूला करतात. खरंतर त्या खड्यात या तरुणाने स्वत:ला गाढून घेतलं होतं. नंतर पोलिस या तरुणाला आतून बाहेर काढतात आणि त्याला धरुन पोलीस स्टेशनला घेऊन जातात.
साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा... Video Viral#viralvideo #trending pic.twitter.com/WqdU61AKrC
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2022
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, उन्नाव जिल्ह्यातील ताजपूर गावातील तीन पुरोहितांनी धार्मिक मार्गाने पैसे कमावण्याच्या आशेने तरुणाला समाधी दिली होती. दफन करण्यात आलेल्या तरुणासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हे वाचा : नवरा तिला ‘काळी’ म्हणून टोमणे मारायचा, अखेर संतापलेल्या बायकोनं पुसलं स्वत:चं कुंकु खरंतर हा व्हिडीओ पोलिसांनीच इंटरनेटवर शेअर केला, ज्यानंतर हा व्हिडीओ लोकांमध्ये पसरू लागला आहे.