जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 10 किमी फरफटत नेल्यानं महिलेची सगळी हाडं तुटली, तरी..; दिल्ली अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV VIDEO

10 किमी फरफटत नेल्यानं महिलेची सगळी हाडं तुटली, तरी..; दिल्ली अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV VIDEO

10 किमी फरफटत नेल्यानं महिलेची सगळी हाडं तुटली, तरी..; दिल्ली अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV VIDEO

10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. आता या भयानक रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या तरुणांची बलेनो कार जाताना दिसत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 जानेवारी : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याचंस समोर आलं. 10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. आता या भयानक रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या तरुणांची बलेनो कार जाताना दिसत आहे. स्कुटीवरच्या महिलेला 10 किमी फरफटत नेलं, नग्न अवस्थेत मिळाला मृतदेह, राजधानी हादरली! या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे. यातील एक क्रेडिट कार्ड कलेक्शनचं काम करतो. मृत तरुणी पार्ट टाईम जॉब करत होती. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने (DCW) पोलिसांना नोटीसही बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजवाला पोलीस स्टेशन (रोहिणी जिल्हा) येथे पहाटे 3 वाजून 24 मिनिटांनी कुतुबगढ भागाकडे जाणाऱ्या कारला एक मृतदेह बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त हरेंद्र कुमार सिंग यांनी सांगितलं की, पीडितेचा पाय कारच्या एका चाकात अडकला आणि तिला गाडीसोबतच फरफटत नेण्यात आलं. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांना अटक करण्यात आली आहे. दीपक हा ड्रायव्हर आहे, अमित उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्डचं काम करतो, कृष्णा कॅनॉट प्लेसमध्ये काम करतो, मिथुन नारायणा येथे हेयर ड्रेसर म्हणून काम करतो आणि मित्तल सुलतानपुरीमध्ये एका खाजगी खाद्य वितरण कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. कार चालक दारूच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमात पार्ट टाईम काम करायची. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती अशाच एका कार्यक्रमातून घरी परतत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात